file photo 
विदर्भ

काय आले हे दिवस; न राहताही यांना द्यावे लागते घरभाडे 

शशिकांत जामगडे

श्रीरामपूर (यवतमाळ) : कोरोना वैश्विक संकट दूर करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने देशात 22 मार्चपासून लॉकडाउन केले आहे. त्यामुळे बाजारपेठा याबरोबरच विविध महानगरांतील नामांकीत कोचिंग क्‍लासेस बंद झाल्याने सद्यःस्थितीत भाड्याच्या घरात न राहताही तीन महिन्यांचे भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे पालकांना मोठा आर्थिक फटका बसत असून, घरमालकांसह गृह विभागाने दिलासा देण्याची गरज आहे. 

ग्रामीण भागात शिक्षणाच्या पाहिजे तशा सोयी उपलब्ध नाही. नामांकीत शाळा, ट्यूशन क्‍लासेसही शहरात असल्याने आपसूकच शिक्षणासाठी अनेक कुटुंबे शहरांकडे स्थलांतर करतात. आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी वसतिगृह किंवा एखादी खोली भाड्याने घेऊन तेथे एखादी महिला व आपली मुले भाड्याच्या घरात ठेवतात. त्यातच दहावीत असणाऱ्या पाल्याबरोबरच विशेष करून बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या पाल्यांचे हे वर्ष टर्निंग पॉइंट असल्याने ज्या पालकांनी आपली पाल्ये ही जेईई, नीटद्वारे इंजिनिअर, डॉक्‍टर होण्याचे स्वप्न पाहिले ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी पालक पाल्यांना आपले गाव सोडून शहर सोडून पुणे, नागपूर, अकोला, नांदेड व लातूर महानगरांमधील शैक्षणिक हब असलेल्या नामांकीत व महागडी क्‍लासेस लावण्याबरोबरच अनेक कॉमन रूम, वसतिगृहात राहत, तर अनेक पालक आपल्या पाल्यांना शैक्षणिक वातावरण मिळावे, म्हणून स्वतंत्र एक रूम, दोन रूम तर काही वन बीएचके असलेले घर ,फ्लॅट भाड्याने घेतात. 

विशेष म्हणजे या ठिकाणाच्या क्‍लासेसजवळील अनेक रहिवाशांनी आपल्या घरावर मजले चढवून विद्यार्थी व पालकांना हवी असतील अशी घरे तयार केली आहेत. विद्यार्थी व पालकांच्या गरजेचा गैरफायदा घेत घरमालकांनी खोली व घरभाड्यात दुपटीने वाढ करीत एक महिना आगाऊचे भाडे घेऊन घर भाड्याने दिले जाते, तर अनेक घरमालकांनी छोट्या रुममध्ये दोन, तीन व चार बेडची व्यवस्था करून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून विद्यार्थ्यांना खुराड्यात कोंबड्याप्रमाणे कोंबून ठेवत आहेत, तर अनेकांनी आपल्या घरालाच वसतिगृह बनवून विद्यार्थ्यांच्या राहण्याची, जेवणाची व इतकेच नव्हेतर क्‍लासेसपर्यंत ने-आण करण्याची व्यवस्थाही केली असून, वर्षभराचे पूर्ण भाडे आधीच घेऊन मोकळे झाले आहेत. कोरोनाचे संकट पंधरवड्यात किंवा एका महिन्यात संपेल, असे वाटल्याने पालकांनी भाड्याने घेतलेली घरे न सोडता तशीच ठेवली. परंतु, कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून कोचिंग क्‍लासेस बंद असल्याने भाड्याच्या घरात न राहताही घर मालक घरभाड्याचा तगादा लावून मागणी करीत आहेत. त्यामुळे अनेकजण आर्थिक फटक्‍यातून वाचण्यासाठी भाड्याची घरे सोडून परत आपल्या गावी येत आहेत. 


माझा मुलगा 12वीच्या तयारीसाठी लातूर येथे गेला होता. राहण्यासाठी दोन खोल्यांसाठी आठ हजार 500 रुपये प्रती महिना भाडे देत होतो. मार्चपासून क्‍लासेस बंद असला तरी घरमालकाने घरभाड्यासाठी तगादा लावला व भाडे घेतले. क्‍लासेस सुरू होण्याची शाश्वती नसल्याने आर्थिक फटका बसू नये, म्हणून भाड्याचे घर सोडून सर्व सामान परत आणले आहे. 
-विष्णू जटाळे, पालक, पुसद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT