अमरावती : प्रत्येक व्हॉट्सअॅप ग्रुपचे (WhatsApp group) काही नियम असतात... काही अटी असतात... पण सारे ते पाळतात का... राजकीय पोस्ट करू नका, फक्त गुडमॉर्निंग-गुड नाईट करू नका, मजकूर कट-पेस्ट करू नका... असे अनेकदा अॅडमिन बजावत असतो. परंतु, काहीजण हटकून तेच करीत असतात. अशांबाबत काय करायचे, हा प्रश्न अॅडमीनसमोर सतत असतो. अमरावतीच्या एका अॅडमिनने अशा सदस्यांना चक्क दंडच (Penalty to members) केला. इतकेच नाही, तर दंड वसूल करून कोविड सेंटरला (Money donated to Covid Center) देणगी म्हणूनही दिला. (WhatsApp-admin-fined-to-member-for-breaking-rules)
‘आमची जिल्हा परिषद’ असे या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव आहे. मोर्शी पंचायत समितीत शिक्षक असलेले मनीष काळे हे या ग्रुपचे अॅडमिन आहे. या ग्रुपवर सुद्धा विविध प्रकारचे ज्ञान, सामाजिक, शुभेच्छा संदेश, राजकीय पोस्टचा भरणा सुरुवातीला होता. शेवटी या पोस्ट रोखण्यासाठी काळे यांनी एक नियमावली केली. दंड किंवा सहकार्य अशी सरळसोपा नियम केला. नियमावली पाळण्याचा अन्यथा दंड देण्याचा इशारा २४ मे पासूनच देण्यात येत होता. तरीही काहींनी नियम मोडलाच. अखेर काळे यांनी दंड केला. विशेष म्हणजे दंड झालेल्या सर्वांनीच दंड भरण्याचे मान्यही केले.
दंड सरळ बँकेत भरायचा आहे. दंडापोटी सध्या जवळपास १० हजारांची रक्कम जमा झाली. ती रक्कम जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरला देणगी म्हणून देण्यात आली. सभासदांनी नियम मोडला म्हणून त्यांच्याकडून दंड वसूल करणारी ‘आपली जिल्हा परिषद’ हा राज्यातील एकमेव असा ग्रुप म्हणता येईल.
आमची जिल्हा परिषद
ग्रुप सदस्य - जि.प.तील शिक्षक, विविध विभागातील कर्मचारी, पदाधिकारी.
ग्रुपचा हेतू - जि.प. विभागातील घडामोडी, शासकीय निर्णय याचा माहिती देणे.
सदस्य संख्या - २५७
दंडाची रक्कम प्रतिव्यक्ती ५०० रुपये
नियम मोडणारे - ३२ सदस्य
दंड भरला २० सदस्यांनी
हे सर्व करताना अनेक नाराज झालेत. मात्र, त्याला इलाज नव्हता. काहीतरी सकारात्मक करण्यासाठी कटू निर्णय घ्यावेच लागतात.- मनीष काळे, ग्रुप अॅडमिन, अमरावती
कोविड सेंटरची संकल्पना
जिल्हा परिषद कोविड सेंटर जिल्हा परिषद प्रशासन, कर्मचारी व अधिकारी या सर्वांच्या सहकार्याने मागील महिन्यात सुरू झाले हो. पण विशेष म्हणजे या कोविड सेंटरची पायाभरणीच मुळात या ग्रुपपासूनच झाली होती.
(WhatsApp-admin-fined-to-member-for-breaking-rules)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.