Maharashtra Assembly Election Politics 
विदर्भ

Vidhansbha Election : ठाकरेंपासून शाहांपर्यंत 'विदर्भ' विधानसभेचं हॉटस्पॉट का ठरतंय?

अक्षता पांढरे

विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. सगळेच पक्ष आपापल्या परीनं कामाला लागले. जागावाटप, वेगवेगळी रणनीती, डावपेच आखले जात आहेत. सभा बैठकांचा धुव्वा उडवला जातायेत. मतदारसंघासाठी मित्र पक्षांशी तडजोडही सुरु आहेत आणि वादही... इकडे महायुतीत भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तर दुसरीकडे काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांचा पक्ष हे मित्रपक्ष जरी असले तरी सगळेच पक्ष आपली वेगळी स्ट्रॅटेजी आखत आहेत. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट यंदाच्या निवडणुकीत कॉमन ठरतेय ती म्हणजे विदर्भ.....विदर्भ जिंकण्यासाठी तिथल्या मतदारसंघात पक्षाच्या मजबुतीसाठी सगळ्याच पक्षाचा लक्ष्य हे विदर्भावर आहे. पण ठाकरेंपासून शाहांपर्यंत 'विदर्भ'विधानसभेचं हॉटस्पॉट का ठरतंय? हेच आपण जाणून घेणार आहोत.

विदर्भ म्हणजे नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. तसे पाहिले विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. म्हणजे जिथे २०१९ ला काँग्रेस महाराष्ट्रातून नाहीसं होण्याच्या मार्गावर होतं. तेव्हा विदर्भातील चंद्रपूरमधून एकमेव खासदार मिळाला होता आणि यंदाच्या २०२४ च्या लोकसभेला काँग्रेसच्या जवळपास सगळ्याच जागा जिंकून आल्या. एकूण काय काँग्रेससाठी विदर्भ तारणहार ठरला. त्यामुळे विधानसभेला सुद्धा कांग्रेस महाविकास आघाडीत विदर्भावर जास्त फोकस करत आहे. मविआच्या जागावाटपात भलेही पश्चिम उत्तर आणि मराठवाड्यात कमी जागा मिळाल्या तरी विदर्भात मात्र जास्त जागा लढण्यासाठी काँग्रेस अडून आहे.

विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही स्पष्टपणे सांगितलं की, 'विदर्भात जास्तीत जास्त जागा कांग्रेसला मिळाल्या तर सत्तेचा मार्ग हा सोपा होईल. महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यात अडचण येणार नाही कारण विदर्भातूनच मुंबईच्या विधानभवनाचा मार्ग जाईल.'

पण विदर्भातील बऱ्याच जागा अशाही आहेत ज्यावर ठाकरे गट आपला दावा सोडायला काही तयार नाहीये. त्यामुळे काँग्रेसची जेष्ठ मंडळी विदर्भातील बड्या नेत्यांच्या, पदाधिकार्‍यांच्या मविआपासून स्वतंत्र बैठका आणि रणनीती आखतायेत.

दुसरीकडे राज ठाकरे ...राज ठाकरेंची मनसे यंदा विधानसभेला पुर्ण ताकदनिशी मैदानात उतरली आहे. गेल्या विधानसभेला केवळ एक आमदार निवडणून आल्यानंतर यंदा नव्या जोमाने पक्ष कामाला लागला आहे. जवळपास सगळ्याच जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. पण या दरम्यान राज ठाकरेंचं विदर्भावर विशेष लक्ष असणार आहे. गेल्याच महिन्यात राज ठाकरे यांनी मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यातचं पक्षाकडून पुन्हा ‘मिशन विदर्भ’ हाती घेण्यात आलंय. विदर्भातील ११ जिल्ह्यांतील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक २७ व २८ सप्टेंबरला अमरावतीला बोलावण्यात आली आहे. २७ सप्टेंबरला पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा व यवतमाळ; तर २८ ला पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे. या बैठकीला राज ठाकरे स्वत: उपस्थित राहून निवडणुकीची रणनिती आखणार आहेत. यात उमेदवारांविषयी चर्चा देखील केली जाणार असल्याचं बोललं जातं.

या सगळ्यात भाजप मात्र यंदा विदर्भासाठी विशेष तयारी करताना दिसत आहे. कारण नुकतेच भाजपचे जेष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना विशेष कानमंत्र दिला. सत्ता हवी असल्यास विदर्भातील किमान ४५ जागा जिंकायला हव्यात, असे सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले.

लोकसभेला ठाकरे- पवारांना मिळालेल यश पाहता. पवार- ठाकरेंना रोखायचं असेल तर विदर्भात ४५ जागा आणा कारण विदर्भ जिंकला तरच महाराष्ट्रात जिंकून येऊ, त्यामुळे विदर्भात जास्तीत जास्त जागा निवडून आणा असेही शाह यावेळी म्हणाले.

एकूण काय काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भात लोकसभा निवडणुकी वेळी भाजपला मोठा फटका बसला. अनेक जागा भाजपला गमवाव्या लागल्या. त्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जरांगे पाटलांचे वारे आहे. याचाही फटका भाजपला जसा लोकसभेला बसला तसा विधानसभेला बसू शकतो याचा अंदाजही कदाचित त्यांना असावा. त्यामुळे विदर्भ जिंकणं हा मोठा अवघड काम भाजपसमोर आहे.

त्यात नागपूर हे विदर्भातील सत्ता केंद्र आहे. आरएसएसचं मुख्यालय देखील नागपुरात आहे. आणि भाजपचा बालेकिल्ला सुद्धा नागपूरच आहे. खासदार देखील भाजपचा आहे. नागपूरातील ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे विदर्भात सत्ता मिळवणं सोप होऊ शकतं, असा भाजपचा अंदाज आहे.

या आणि अशा अनेक कारणामुळे सध्या विदर्भात राजकीय घडामोडींवा वेग आला आहे. विदर्भ हे विधानसभेच हॉटस्पॉट बनत चाललं आहे. त्यामुळे आता विधानसभेला विदर्भात कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्त्वाच ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबई परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

Mumbai School Holiday: मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबईत मुसळधार! लोकलसेवेवर मोठा परिणाम, ट्रेन तब्बल ३० ते ४५ मिनिटे उशीराने, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

Politics: लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य, भाजप आमदारामुळे महायुतीचं सरकार अडचणीत?

Rain Update: पालघर आणि नाशिकसाठी रेड अलर्ट, तर मुंबईसह पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, वाचा 26 सप्टेंबरला कशी असेल पावसाची स्थिती?

SCROLL FOR NEXT