दिग्रस (जि. यवतमाळ) : तालुक्यातील कळसा येथील शिवारातील एका शेतात क्रेनच्या (Crane) साह्याने विहीर खोदण्याचे काम (Well digging work) सुरू असताना क्रेनसह ४५ वर्षीय महिला विहिरीत पडली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तरुण मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी घडली. शोभा गजानन राठोड (वय ४५, रा. कळसा) असे मृत महिलेचे नाव असून, अनिल गजानन राठोड (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. (Woman dies after falling into well with crane in Yavatmal)
कळसा गावातीलच अशोक चौरे यांच्या शेतात क्रेनच्या सहायाने विहिरीचे खोदकाम सुरू होते. त्यात विहिरीतील मोठा दगड काढताना क्रेनचा तोल सांभाळल्या न गेल्याने क्रेन घसरत सरळ क्रेनचालक महिलेसह ३० फूट खोल विहिरीत पडली. त्यात महिलेचा डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. आधीपासूनच विहिरीत उतरलेला त्या महिलेचाच मुलगा अनिल गजानन राठोड हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ खागी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच दिग्रसचे पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, उपनिरीक्षक शशिकिरण नावकार, रवींद्र जगताप, सुजित जाधव घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह खाटेला दोरी बांधून विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
कळसा गावातून हळहळ
कळसा गावातील रहिवासी असलेल्या शोभा गजानन राठोड (वय ४५, रा. कळसा) यांचा असा मृत्यू झाल्याचे कळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. आईचा मृत्यू व मुलगा जखमी झाल्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
(Woman dies after falling into well with crane in Yavatmal)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.