भंडारा : आसाम राज्यातील महिला सहा वर्षांपूर्वी कुुुुटुंबापासून दुरावली. ती ठाणा येथे विक्षिप्तावस्थेत फिरत असताना सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्यकर्त्याला दिसली. त्यानंतर जमिअत उलेमाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून तिच्या कुटुंबासोबत संपर्क साधला. ही महिला सहा वर्षांनंतर शनिवारी तिच्या कुटुंबात सुखरूप पोहोचली आहे.
जमीअत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मुफ्ती मो. साजिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारीला ठाणा (पेट्रोल पंप) येथे कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या सुमारास एक अनोळखी महिला सामाजिक कार्यकर्त्या फरजाना यांना दिसली. त्यांनी सखी वन स्टॉप सेंटर भंडारा यांना तिची माहिती दिली. ती महिला खूप तणावात दिसत होती. ती स्थानिक भाषा बोलण्यास असमर्थ होती. केंद्र प्रभारी मनीषा यांनी त्या महिलेची विचारपूस केली तेव्हा आपले गाव व घर कुटुंबाबाबत लिहून माहिती सांगितले. यावरन तिचे नाव हलीमा अहमद असल्याचे माहित झाले.
याबाबत भंडारा येथील जमीअत उलमा समितीला माहिती देण्यात आली. प्रतिनिधी मंडळचे मौलाना फराज अहमद, हाफीज इमरान, हाफीज अबरार खान, हाफीज असरार खान व सामाजिक कार्यकर्ता अतिक जमा पटेल यांनी सदर केंद्रात जाऊन महिलेची भेट घेतली.
त्यांनी जमीअतच्या गुवाहाटी शाखेशी संपर्क साधून दोन तासांत त्या महिलेचे तिच्या कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलवरून बोलणे करून दिले. सदर महिलेला भंडारा जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी ठेवले. दरम्यान केंद्राद्वारे न्यायप्रक्रिया पूर्ण झाल्यावर 19 फेब्रुवारीला महिलेचा भाऊ अतीकुल इसलाम भंडारा येथे जमीअतच्या कार्यालयात आला. त्याने पूर्ण कारवाई केल्यानंतर जमीअत कार्यालयात महिलेला आणण्यात आले.
महिलेचा भाऊ अतिकूल इसलाम यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2015 ला अचानकपणे ती घरून बेपत्ता झाली. ती सुशिक्षित व लग्न झालेली गृहिणी असून दोन मुलेही आहेत. कुटुंबातील लोकांनी तिचा इकडे-तिकडे खूप शोध घेतला. पण तिचा सुगावा लागला नाही. तिच्या शोधात अनेक वर्षे निघून गेले.
येथे जमीअत उलेमाच्या पदाधिकाऱ्यांनी तिला खासगी वाहनाद्वारे नागपूर विमानतळावर पोहोचवून दिले. त्यानंतर ती शनिवारी गुवाहाटी (आसाम) येथे आपल्या घरी सुखरूपपणे पोहोचली. जमीअत-उल्मा-ए हिंद भंडारा शाखेच्या या कार्याचे कौतुक होत आहेत. या कामात जमीअतचे भंडारा शाखा अध्यक्ष मुफ्ती मो. साजिद, सचिव मो. फराज अहमद, इमरान खान, अबरार खान, इसरार खान यांनी सहकार्य केले.
अपहरण आणि सुटका
हलीमा अहमद यांनी आपबीती सांगितली की, तिचे अपहरण करण्यात आले होते. जेव्हा शुद्धीवर आली, तेव्हा ती जयपूर (राजस्थान) येथे होती. तिथे तिच्यावर खूपच शारीरिक व मानसिक अत्याचार करण्यात आले. तिला एका बंद कोठडीत डांबून ठेवण्यात आले होते. एक दिवस ती कोठडीतून पळून जाण्यात यशस्वी झाली. परंतु, भाषेची अडचण असल्याने तीला कोणाचीही मदत मिळाली नाही. त्यानंतर विक्षिप्तावस्थेत इकडे-तिकडे भटकू लागली. जानेवारी महिन्यात भंडारा जिल्ह्यातील ठाणा येथे रस्त्यावर आली असताना सखी वन स्टॉप सेंटरने तिला आश्रय दिला.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.