विदर्भ

नारीशक्तीने उभारली शेतकरी उत्पादक कंपनी; ऑनलाइन नोंदणी करताच भाजीपाला घरपोच

सूरज पाटील

यवतमाळ : बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम (Woman Empowerment) करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. बचतगट अजूनही कुरड्या, पापड्यातच गुंतल्याचे दिसून येते. मात्र, घाटंजी तालुक्‍यातील नारीशक्तीने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर "महिला उत्पादक लिमिटेड कंपनी' (Woman Production Limited) सुरू केली. ग्राहकांनी ऑनलाइन नोंदणी (Online Registration) करताच तीन तासांत त्यांच्या घरपोच भाजीपाला (Vegetables Home delivery) पोचविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी "प्युअर एन शूअर' (Pure N Sure App) मोबाईल ऍपही विकसित केले आहे. (Women from yavatmal district started Online vegetable delivery app)

प्रत्येक क्षेत्रात महिला गगनभरारी घेत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या कोठेही मागे राहत नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मोडकळीस आली असतानाच महिलांनी भाजीपाला विक्रीसाठी उत्पादक कंपनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अर्थसाहाय्य मिळाले नाही. स्वत:जवळील पुंजी व्यवसायात ओतून "आत्मनिर्भर' होण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महिला उत्पादक लिमिटेड कंपनीत एकूण एक हजार 723 महिला सदस्य आहेत.

दोन वर्षांपूर्वी या महिला शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून व्यापाऱ्यांना विक्री करीत होत्या. त्यातून दोन पैसे त्यांच्या हातात पडू लागले. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी भाजीपाला विक्रीचा विचार डोक्‍यात आला. एखाद्या ठिकाणी दुकान थाटून विक्री केल्यास वेगळे काही दिसणार नाही. दरम्यान महिलांचा संपर्क सचिन काळे व निखिलेश लाखेकर या होतकरू तरुणांशी झाला. दोघांनाही व्यवसायातील तांत्रिक ज्ञान असल्याने त्यांनी महिलांना यथायोग्य मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.

त्यातूनच ऑनलाइन नोंदणी करून घरपोच भाजीपाला देणाऱ्या ऍपचा जन्म झाला. हातातील मोबाईल अनेकांच्या जीवनात क्रांती आणत आहे. व्यावसायिक ऍपच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. या महिलांनी सुद्धा आपला व्यवसाय वाढविण्यासाठी मोबाईल ऍपचा सहारा घेतला आहे. भाजीपाला उत्पादक असलेल्या 14 महिला शेतकऱ्यांचा घाटंजी तालुक्‍यातील मुरली येथे भूमी उत्पादक गट नावाने संकलन केंद्र आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भाजीपाला संकलित केला जातो. यवतमाळला वितरण केंद्र आहे. येथे दोन महिला भाजीपाला साफसफाई आणि पॅकेजिंग करतात. दोन युवक ऍपवर नोंदणी केलेल्या ग्राहकांना अगदी वेळेत भाजीपाला पोहोचविण्याची व्यवस्था करतात. विशेष म्हणजे भाजीपाला संदर्भात ग्राहकांनी काही तक्रार केल्यास बदलवूनदेखील दिला जातो. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात ही कंपनी यवतमाळ शहरातील 560 ग्राहकांच्या विश्‍वासाला पात्र ठरली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदी करून त्यांना मार्केटचा भाव दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक, अडत खर्च वाचत आहे. शिवाय नियमित पैसा हातात पडत आहे. आगामी काळात जिल्ह्यातील बचतगटांनी निर्मित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचा मानस महिला उत्पादक कंपनीचा आहे.

मशीनद्वारे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया

शेतकऱ्यांकडून भाजीपाला संकलन केंद्रात आणल्यावर यूव्हीलाइट टनेल मशीनद्वारे निर्जंतुकीकरण केले जाते. ओझेनायझेशन वॉशर मशीनद्वारे भाजीपाल्यात असलेले केमिकल धुतल्या जातात. म्हणजे सर्व प्रक्रिया करून शुद्ध व ताजा भाजीपाला घरपोच मिळतो.

"प्युअर एन शूअर'नावाचे ऍप विकसित करण्यात आले असून, प्ले-स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येते. आपल्याला जो भाजीपाला, फळे हवेत त्याची नोंदणी केल्यावर तीन तासांत नोंदणी केलेला भाजीपाला व फळे घरपोच मिळतात. ज्येष्ठांसाठी फोनवर नोंदणीची सुविधा आहे.
-सचिन काळे, संचालक, प्युअर एन शूअर.

(Women from yavatmal district started Online vegetable delivery app)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT