SYSTEM
विदर्भ

आंदोलनकर्त्या कामगाराचा मृत्यू; मृतदेह ठेवला कंपनीच्या गेटसमोर

सकाळ वृत्तसेवा

पालोरा करडी (जि. भंडारा) : देव्हाडा येथील एलोरा पेपर मिल मालकाने कामगारांना कामावरून कमी केले. याविरोधात आंदोलनाला बसलेल्या कामगारांपैकी कामगाराचा प्रकृती खालावल्याने भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १७) घडली. हंसराज परसराम मारबते (वय ५९, रा. देव्हाडा) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे कामगारांमध्ये कंपनीविरोधात तीव्र संताप आहे.

एलोरा पेपर मिल येथे दीडशेच्या वर कामगार कार्यरत होते. परंतु, मिल मालकाने दीड वर्षापूर्वी एकाएकी कामगारांना कामावरून काढून टाकत कंपनीसुद्धा बंद केली. त्यामुळे कामगारांवर उपासमारीचे जीवन जगण्याची वेळ आली. कंपनी पूर्ववत सुरू करून कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी कामगारांनी ९ ऑगस्टपासून कंपनीसमोर आंदोलनाला सुरुवात केली.

आंदोलनात सहभागी असलेले ऑपरेटर हंसराज मारबते यांची मंगळवारी आंदोलनस्थळी सकाळी ११च्या सुमारास प्रकृती खालावली. त्यांना तुमसर येथील दवाखान्यात नेण्यात आले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथे हलविले. उपचार सुरू असतानाच दुपारी ४ च्या सुमारास हंसराज मारबते यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

कंपनीच्या गेटसमोर ठेवला मृतदेह

कामावरून काढल्यामुळेच हंसराज मारबते यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पेपर मिल कंपनी मालकावर कारवाई करण्यात यावी. मारबते यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी करीत मृतदेह कंपनीच्या गेटसमोर ठेवला. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली होती. दरम्यान, कंपनीने मृत मारबते यांच्या वारसांना २५ हजार रुपये दिल्यानंतर मृतदेहावर सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

न्यायासाठी लढताना एका कामगाराचा मृत्यू झाला. कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन केले जाईल.
- चरण वाघमारे, अध्यक्ष, राष्ट्रीय मजूर संघ, देव्हाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT