drought esakal
विदर्भ

World Environment Day : विदर्भापेक्षा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तापणार!

वाढलेल्या लोकसंख्येमुळे शहरे वाढली विकासकामे व औद्योगिकीकरणामुळे जमिनीचे वाळवंटीकरण होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वाढलेल्या लोकसंख्येमुळे शहरे वाढली विकासकामे व औद्योगिकीकरणामुळे जमिनीचे वाळवंटीकरण होत आहे. त्यामुळे ‘अर्बन हिट’ आणि परिसरातील उष्णतामान वाढत असताना विदर्भात वृक्षाच्छादन असल्याने या परिसरातील तापमान स्थिरावलेले आहे.

मात्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानासह पावसाच्या दिवसांमध्ये वाढ झाली असल्याचे दोन ते तीन वर्षांच्या आकडेवरीवरून दिसून येत आहे. जमिनीचा ऱ्हास,वाळवंटीकरण रोखणे आणि दुष्काळाचा सामना करण्याची क्षमता प्रस्थापित करणे ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे.

देशात मोठ्या प्रमाणात वाढलेले उद्योग, प्रदूषण आणि उत्सर्जित होणारे प्रदूषित वायू, विशेषतः कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर वाढले आहे. तापमान कमी ठेवणारे आणि कार्बनवायूचे प्रमाण कमी करणारी जंगले उद्योग आणि विकासकामांसाठी तोडली जात आहे.

वाढत्या वाळवटींकरणामुळेच वाढलेले तापमान कितीही प्रयत्न केले तरी पुढची १० वर्ष कमी होणार नाहीत. यावर निर्बंध आणण्यासाठी उद्योगातून थर्मल पॉवर स्टेशनमधून उत्सर्जित होणारे वायू प्रदूषण कमी करणे, शहरात आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यावर भर देणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात रस्ते, रेल्वे मार्गाच्या दुतर्फा, शेती परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणावर भर द्यावा लागणार आहे. राज्यात सध्या २२ टक्के जमिनीवर वृक्षाच्छादन असले तरी त्यातील २० टक्केच वनक्षेत्रावर जंगल आहे.

उर्वरित दोन टक्के वृक्षाच्छादन खासगी जमिनीवर म्हणजे जंगल क्षेत्र नसलेल्या ठिकाणावर आहे. ३३ टक्के जमिनीवर जंगल असावे असे धोरण आहे. त्यामुळे जंगलाचे क्षेत्र वाढणे कठीण असल्याने आता खासगी जमिनीवरच वृक्षाच्छादनावर भर द्यावा लागणार आहे. ते वाढल्यावरच तापमान वाढीसह अतिपाऊस, दुष्काळ, पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.

आपली भूमी, आपले भविष्य’ यंदाचे घोषवाक्य असून त्याला पूरक असे धोरण सरकारने आखणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात नैसर्गिक आपत्तीच्या दिवसांच्या आकडेवारीत वाढ होणार आहे. दोन वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास विदर्भापेक्षा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्ण दिवसाच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळेच नागरी वृक्षाच्छादनावर भर देण्याच्या सूचना केंद्र सरकारला केलेल्या आहेत.

- प्रा. सुरेश चोपणे, माजी सदस्य, केंद्रीय वने, पर्यावरण व जल वायू परिवर्तन मंत्रालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates : राजनाथ सिंह यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल सशस्त्र दल आणि उद्योगाचे अभिनंदन केले

Uric Acid Home Remedies: युरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास सकाळी रिकाम्यापोटी 'ही' गोष्ट पाण्यात उकळून प्यावी, मिळेल आराम

SCROLL FOR NEXT