अकोला : सततच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या ताणतणावामुळे नागरिक हसणेच विसरत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता संपूर्ण जगात थैमान घातलेल्या ‘कोरोना’मुळे चिंतेत अधिक भर घातली आहे. अनेक रोगांवरील रामबाण उपाय असलेले हसणे चेहऱ्यावरून गायब झाले आहे. ‘कोरोना’त चिंता नाही तर काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हे चिंतेचे ढग लवकरच हटणार आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खुलणार हे विशेष.
सातत्याने आजूबाजूला वाढणारी तीव्रस्पर्धा, त्याला सामोरे जाताना येणारे अपयश, त्यामुळे तोंड द्यावे लागणाऱ्या नैराश्यावर प्रभावी औषध असणाऱ्या हसण्याचा सर्वांना विसर पडू लागला आहे. दैनंदिन आयुष्यात व्यक्ती मात्र आपल्या हसणे या नैसर्गिक भावनेला विसरला. दिवसभरातील कामाचा शिण उरकून घरी आल्यानंतरदेखील कुटुंबाच्या जबाबदारीत तो अडकून पडला. या सगळ्यात हसण्याकरिता त्याला निमित्त शोधावे लागत आहे.
हसण्यासाठी टीव्हीवरिल विनोदी वाहिन्या, चित्रपट, सोशल मीडियावरिल व्हिडीओचा आधार घ्यावा लागत आहे. कोरोनामुळे लोकांच्या चेहऱ्यावरिल हास्य दिसेनासे झाले आहे. हे खरंच आहे की, हसणे हा अनेक रोगांवरील रामबाण उपाय मानला जातो. सकाळी फिरायला गेल्यावर अनेकांना जोरजोरात हसताना पाहिले असेल. हा नजारा बघणे जरा विचित्र ठरू शकते. पण हे आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे.
का साजरा करतात हास्य दिन?
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाच सुरुवात मुंबईमधूनच झाली होती. हा दिवस सर्वात आधी 10 मे 1998 या दिवशी डॉ.मदन कटारिया यांनी साजरा केली होता. आज दिवसभरामध्ये जवळपास 100 देशांमध्ये मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे, लोकांना हसण्याच्या फायद्यांबाबत जागरूक करणे हाच आहे.
हे आहेत हसण्याच्या काही फायदे
हसण्याबद्दल काही गमतीशीर फॅक्टस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.