विदर्भ

Vidarbha Rain : यवतमाळ, बुलडाण्यात आभाळ फाटले

विदर्भात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी पावसाच्या रौद्रावतारामुळे यवतमाळ, गडचिरोली, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - विदर्भात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी पावसाच्या रौद्रावतारामुळे यवतमाळ, गडचिरोली, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात अनंतवाडी -आनंदनगर तांडा येथे पुरात अडकलेल्या ११० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. संततधार पावसाने गडचिरोलीत जिल्ह्यातील १३ प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. अकोला जिल्ह्यात अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. बुलडाणा आणि अमरावतीत दोन जण वाहून गेले आहेत.

मागील तीन-चार दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेल्या अनंतवाडी-आनंदनगर तांडा येथे पुरामुळे नागरिक अडकले होते. येथील ६० घरांना पाण्याने वेढले होते. बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून शनिवारी सायंकाळच्या सुमारास ११० जणांना बोटीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.

नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर नागपूरवरून आले होते. मात्र, झाडे आणि तारांच्या अडथळ्यामुळे हेलिकॉप्टर परत गेले. अखेर राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने बोटीच्या मदतीने सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. यवतमाळ शहरातही पावसाने धुमाकूळ घातला असून संपूर्ण शहर जलमय झाले आहे.

..अन् संपर्क तुटला

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्‍यात काल (ता.२१) सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबलेला नाही. यामुळे संग्रामपूरचा शेगाव, जळगाव जामोद या तालुक्‍यांशी असलेला संपर्क तुटला आहे. तसेच तालुक्‍यातील वान, लेंडी, आलेवाडी, पांडव, केदार, पूर्णा या नद्यांना पूर आला असून लाडणापूर, बानवबीर, सोनाळा, वरवट बकाल, वडगाव, वानखेड तसेच संग्रामपूर शहरात पुराचे पाणी शिरले आहे. या गावांमधील घरांमध्ये पाणी शिरल्‍याने अनेकांनी सुरक्षितस्‍थळी हलविण्यात आले. तसेच काथरागाव, पिंप्री येथील १२० जणांना ‘एनडीआरफ’च्‍या चमूने सुखरूप बाहेर काढले.

विद्रुपा नदीला पूर

अकोला जिल्ह्यात शनिवारी संततधार पाऊस झाला. त्यामुळे नदी व नाल्यांना पूर आला. काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. संपूर्ण तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पावसाचे पाणी शेतात शिरल्याने हजारो हेक्टरवरील शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. पुरामध्ये अडकलेल्या पाथर्डीतील दोघांना यशस्वीरीत्या काढण्यात प्रशासनाला यश आले. तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या तळेगाव बाजार येथील विद्रुपा नदीला पूर आला. या नदीवरील पूल खचल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.

गडचिरोलीत महामार्ग बंद

गडचिरोलीत सतत कोसळत असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी जिल्ह्यातील १३ मार्ग बंदच आहेत. शिवाय अनेक ठिकाणी पुलांना जोडणारे रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. रोमपल्लीजवळ १० फूट रस्ता खचला आहे. त्यामुळे बस व इतर मोठ्या वाहनांची वाहतूक थांबली आहे. अंकिसा ते चिंतरवेला नाल्यावरील रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. बामणी, कंबालपेठा ते पुसुकपल्लीला जोडणाऱ्या नाल्यावरील पूल पूर्ण तुटला आहे.

कोकणात जोर कायम

कोकणातही सर्वच भागांत जोरदार पाऊस पडत असून, धबधबे ओसंडून वाहत आहेत. वाशिष्टीसह, काही नद्यांनी धोक्याची पाणी पातळी ओलांडली आहे. तर काही नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा कमी आहे. भिवंडीत रस्त्यांवर पाणी साचल्याने ते अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते त्यामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले होते. मुसळधार पावसामुळे तानसा धरण भरत आल्याने कधीही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी

मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापुरातील पंचगंगा धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. जवळपास ६८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासन हाय अलर्टवर आहे. सोलापूर, नगर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. त्यामुळे या भागातील धरणांतील पाणीसाठ्यात बऱ्यापैकी वाढ होत आहे. अनेक धरणांतील पाणीसाठा हा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. खानेदशातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी बरसत आहे. काही ठिकाणी पावसाची उघडीप आहे.

मराठवाड्यात काही मंडळांत अतिवृष्टी

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील दोन ते तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. शनिवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथे उच्चांकी ३१८.५ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धाराशिवमधील रामलिंग धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागला आहे. नांदेडमधील माहूर येथे ३०५ मिलिमीटर पाऊस पडला. किनवट तालुक्यात संततधार पावसामुळे पैनगंगा नदी भरून वाहत आहे. नदीकाठच्या तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पाणीपातळी वाढली आहे. माहूरकडे येणारा एकमेव धनोडा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पैनगंगा परिसरातील अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परभणी, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे.

दिवसभरात

  • अनेक मंडळांत शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस

  • नद्या, जल प्रकल्पांतील पाणीपातळीमध्ये वाढ

  • गोंदिया जिल्ह्यात वीज पडून दोघाजणांचा मृत्यू

  • पैनगंगा परिसरातील अनेक गावांना पुराचा वेढा

  • विदर्भात तीन जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक

  • सातपुड्यातून वाहणाऱ्या सर्व नद्यांना महापूर

  • कोकणात नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली

  • मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये ‘जोर’धार

  • खानदेशामध्ये अनेक ठिकाणांवर तुरळक सरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT