drowned  sakal
विदर्भ

Crime News : भाच्याचा शोध घेण्यासाठी तळ्यात मारली उडी; भाच्यासह मामाचा बुडून मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

पुसद (जि. यवतमाळ : तालुक्यातील धनसळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मनसळ येथील सासऱ्याच्या शेतालगत असलेल्या तळ्यामध्ये एक सहा वर्षे व एक सात वर्षे वय असलेले चिमुकले पोहण्यासाठी गेले होते.

त्यापैकी एका चिमुकल्याला पाण्यात पोहण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता.१६) सायंकाळी चार दरम्यान घडली. भाच्याला वाचविण्यासाठी गेलेल्या चुलत मामाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

चुलत मामाचा मृतदेह रात्री उशीर मिळाल्याने त्या दोघांचेही शनिवारी (ता.१७) पुसद उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.

भाचा करण सुखदेव यरके (वय सात) व चुलत मामा रोहिदास रामभाऊ टाळकुटे (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार रामभाऊ टाळीकुटे यांच्या शेतालगत तळे आहे. त्या तळ्यामध्ये पोहण्यासाठी करण व अर्जून संध्याकाळी चार वाजता गेले.

बराच वेळ झाला करण परत आलाच नाही. अर्जुनला पोहता न आल्याने तो तळ्याच्या काठीच उभा होता. त्यानंतर त्याचा भाऊ करण पाण्यात बुडाल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने आई व मामाकडे धाव घेतली.

त्यानंतर त्याचा मामा तळ्याजवळ आला. करण कुठेही दिसत नव्हता. म्हणून मामा रोहिदास याने पाण्यात उडी घेऊन करणला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, यामध्ये मामा रोहिदासचाही बुडून मृत्यू झाला. दोघेही पाण्यात बुडाल्याची माहिती नातेवाइकांना व ग्रामस्थांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गावकऱ्यांच्या मदतीने करणला शोधण्याचा प्रयत्न केला असता मृतदेहच हाती लागला. चिमुकल्याचा मृतदेह पाहून त्याच्या आईने व नातेवाइकांनी एकच टाहो फोडला. अशातच रोहिदास कुठेही आढळून न आल्याने तलावाजवळ गावकऱ्यांनी गर्दी केली. त्यानंतर याबाबत नागरिकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधला.

बचाव पथक घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांनी शोध कार्याला गती दिली. रात्री साडेनऊच्या सुमारास मामा रोहिदासचाही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

Atishi Marlena: आतिशी यांचा आज शपथविधी, जुन्या निष्ठावंत मंत्र्यांवर पुन्हा विश्वास

Khambatki Ghat Accident : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात अपघात; मालट्रकने चार कार गाड्यांना उडविले

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीतला जागावाटपाचा तिढा होणार दूर? 'हा' असणार नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT