yavatmal crime update doubt of immoral relationship husband killed 4 along with wife police esakal
विदर्भ

Yavatmal Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; जावयाने पत्नी, सासरा, दोन मेहुण्यांची केली निर्घृण हत्या

कळंब तालुक्यातील तिरझडा येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

Yavatmal News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जावयाने पत्नी, सासरा आणि दोन मेहुण्यांवर लोखंडी सब्बलीने हल्ला चढवीत चौघांचीही निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात सासू गंभीर जखमी झाली असून, यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना मंगळवारी (ता.१९) रात्री दहा ते साडेदहा वाजता कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर घडली. या घटनेने यवतमाळ जिल्हा हादरून गेला आहे. सासरच्या मंडळीचा खून करून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेला जावई गोविंदा बिरचंद्र पवार (वय ४०, रा. कळंब माथा) याला कळंब पोलिसांनी रात्रीच अटक केली.

मृतांमध्ये आरोपीची पत्नी रेखा गोविंदा पवार, सासरे पंडित घोसले, दोन साळे ज्ञानेश्‍वर ऊर्फ नाना पंडित घोसले व सुनील पंडित घोसले यांचा समावेश असून आरोपीची सासू रुख्मा पंडित घोसले ही गंभीर जखमी आहे.

पंडित घोसले हे कुटुंबीयांसमवेत तिरझडा (पो. धोत्रा, ता. कळंब) येथील पारधी बेड्यावर राहत होते. त्यांची लहान मुलगी रेखा हिचा विवाह गोविंदा पवार याच्याशी झाला होता. तो नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालायचा. घोसले परिवाराने त्याला समजावून सांगितले होते. मात्र, तो कुणाचेही ऐकत नसल्याने सासरा व साळ्याने त्याला यापूर्वी एकदा मारहाण केली होती.

मंगळवारी रात्री दहा वाजता गोविंद, पत्नी रेखासोबत जेवणाचा डब्बा घेऊन घोसले कुटुंबाच्या शेतात गेले. त्या ठिकाणी साळा सुनील होता. तेथे गोविंदने सुनील व पत्नी रेखाचा खून केला. त्यानंतर घरी येऊन सासरे पंडित, साळा ज्ञानेश्‍वर यांच्यावर लोखंडी सब्बलीने हल्ला करून त्यांना ठार केले.

तर सासू रुख्मा यांना गंभीर जखमी केले. घराच्या टिनपत्राचा आवाज आल्याने शेजारी बाहेर आले व त्यामुळे ही घटना उघडकीस आली. गंभीर जखमी रुख्मा यांना उपचारासाठी कळंब येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

कळंब पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी रमेश बाबाराव घोसले (वय ४५, रा. पारधी बेडा, तिरझडा) याने दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला.

पोलिसांनी तातडीने आरोपी गोविंदा पवार याला फरार होण्याच्या तयारीत असतानाच अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दीपमाला भेंडे,

पोलिस उपनिरीक्षक आशीष शिंदे, सागर भारस्कर, सुरेश झोटिंग, ओमप्रकाश धारणे, राजू कुडमेथे, राजू इरपाते, गजानन धात्रक, गजानन कोरडे, नितीन कडुकार, मंगेश ढबाले यांनी केली.

दोन महिन्यांपासून सासुरवाडीत

गोविंदा पवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने गेल्या वर्षी सासरा व साळ्याने जावयाला मारहाण केली, त्याचा वचपा म्हणून खून केला. दोन महिन्यांपासून मारेकरी गोविंदा हा सासुरवाडी तिरझडा येथे मुक्कामी होता. पत्नीसोबत शेतात काम करायचा, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मतदान प्रक्रियेत अडचणी, शिवडी-लालबाग मतदारसंघातील केंद्र क्रमांक ४१ येथील ईव्हीएम मशीन बंद

Satara Assembly Election 2024 : उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार

Maharashtra Assembly Elections 2024: मतदान करायला जाताय? मग नाश्त्यात बनवा दुधीचे थालीपीठ, दिवसभर राहाल उत्साही

Mumbai Election: मुंबईचा किंग कोण? या चुरशीच्या लढतींकडे राज्‍याचे लक्ष!

Accident: मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT