yavatmal crime update gang rape of minor girl case registered against 5 persons police  Esakal
विदर्भ

Yavatmal Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : येथील शिवाजी गार्डन रोड परिसरातून दुचाकीवर बसवून गोधणीच्या जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता.सात) व रविवारी (ता.आठ) घडली असून, या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

आयुष प्रभाकर उकरे (वय १९, रा. तारपुरा), संकेत वसंता पेंदोर ( वय २१, रा. गोधणी), विष्णू राजू मेश्राम (वय २६, रा. डोर्ली), अभिजित गजानन भोंगे (वय २४, रा. साईबाबानगर) आणि सूरज अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. अल्पवयीन मुलगी शनिवारी (ता.सात) सकाळी दहा वाजतादरम्यान घरून एकटीच शिवाजी गार्डन येथे गेली होती. त्यावेळी आयूष, संकेत, विष्णू यांच्याशी तिची ओळख झाली.

त्यानंतर संकेतने दुचाकीवर बसवून गोधणीच्या जंगलात नेले. काही वेळाने विष्णूही एका वाहनाने आला. तिथे सामूहिक अत्याचार केल्यावर शिवाजी गार्डन येथे सोडून दिल्यावर पीडिता घरी गेली. रविवारी अल्पवयीन मुलगी आजीला मैत्रिणीकडे अभ्यासाला जात असल्याचे सांगून शिवाजी गार्डन येथे आली. यावेळी सूरज याच्या दुचाकीने भोसा येथील रुमवर गेली. रात्री दरम्यान चारवेळा जबरीने अत्याचार करून दुसऱ्या दिवशी सावरच्या बसस्थानकावर सोडून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जम्मू-काश्मीरमध्ये बस खोल दरीत कोसळली; 4 जवान ठार, २८ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT