nagar panchayatm election sakal
विदर्भ

यवतमाळ : नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, भाजपचा दारुण पराभव

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील महागाव, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, झरीजामणी व मारेगाव या नगरपंचायतीचा निवडणूक निकाल बुधवारी (ता.19) जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. तर, भारतीय जनता पक्षाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेचीही या निवडणुकीत सरशी झाली आहे.(nagar panchayat election)

सहाही नगरपंचायतीत 102 जागांसाठी एकूण 534 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. काँग्रेस सर्वाधिक 39 जागी विजय मिळवून मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेला 25 जागा, भाजप 13, राष्ट्रवादी काँग्रेस चार, मनसे तीन, वंचित बहुजन आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. तर, अपक्षांनी सतरा ठिकाणी बाजी मारली. भाजपचे माजीमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. अशोक उईके यांना राळेगाव नगरपंचायतीत खातेही उघडता आले नाही. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही अपेक्षेप्रमाणे यश मिळविता आले नाही. राळेगाव व झरी जामणी येथील सत्ताही भारतीय जनता पक्षाला गमवावी लागली.

''नगरपंचायत निवडणुकीत 39 जागा मिळवून काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, शिवसेनेने 25 जागी विजय खेचून आणला आहे. 2015 मध्ये शिवसेनेच्या केवळ 14 जागा होत्या. आता अकरा जागा वाढल्याने आकडा 25 व पोहोचला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षांच्या जागात कमालीची घट झाली आहे. या विजयाने आगामी काळात होणार्‍या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आत्मविश्‍वासात वाढ झाली आहे.''

- पराग पिंगळेजिल्हाप्रमुख, शिवसेना.

'’हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचा विजय आहे. नगरपंचायत निवडणुकीत नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले. या निकालाने समाधानी आहे. भाजपला काँग्रेस पक्षच आव्हान देऊ शकते, हे यावरून सिद्ध झाले आहे.''

-डॉ. वजाहत मिर्झा, अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT