विदर्भ

धक्कादायक ! उमरखेडमध्ये चालत्या बसमधून ७३ प्रवाशांना उतरवून बसला लावली आग, ५ ते ६ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

चार अज्ञातांनी मोटारसायकल बससमोर आडवी लावून बस अडविली. त्यांच्या पाठीमागून आलेल्या पाच-सहा लोकांनी काही कळायच्या आत बसची तोडफोड करून टायरवर पेट्रोल टाकून आग लावली.

Manoj Bhalerao

Yavatmal News: नांदेडहून नागपूरसाठी रात्री नऊ वाजता निघालेल्या एसटी बसला दोन मोटरसायकल घेऊन आलेल्या चार अज्ञातांनी मोटारसायकल बससमोर आडवी लावून बस अडविली. त्यांच्या पाठीमागून आलेल्या पाच-सहा लोकांनी काही कळायच्या आत बसची तोडफोड करून टायरवर पेट्रोल टाकून आग लावली. ही घटना शुक्रवारी (ता.२७) रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान उमरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैनगंगा नदी पुलावर गोजेगावजवळ घडली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नांदेड आगाराची बस (क्र. एमएच२० जीसी३१८९) ही शुक्रवारी नांदेड-नागपूर मार्गावर धावत असताना रात्री ११ च्या सुमारास हदगाव-उमरखेडदरम्यान गोजेगाव जवळील पैनगंगा नदी पुलाजवळ आली असता त्या ठिकाणी दोन दुचाकीस्वारांनी आपल्या दुचाकी आडव्या लावून बस थांबविली.

त्यानंतर पाठीमागून आलेल्या पाचसहा अज्ञात व्यक्तींनी बसमध्ये असलेल्या ७३ प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. पाठीमागून आलेल्या आणखी पाचसहा अज्ञात व्यक्तींनी काठीने बसच्या काचा फोडल्या व बसच्या टायरवर पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत बस जळून खाक झाली. यामध्ये बसचे सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाले. बस चालक बी. डी. नाईकवाडे यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलीस पथक, अग्निशामक दलासह घटनास्थळी पोहचले व पंचनामा केला. घटनास्थळी नांदेड व यवतमाळचे विभाग नियंत्रक, उमरखेड आगाराचे व्यवस्थापक प्रकाश भदाडे हे देखील पोहचले. त्यांनी पर्यायी बसची व्यवस्था करून प्रवाशांना सुखरूप नागपूरकडे रवाना केले. ह्या बसला कुणी व का आग लावली, याचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT