Yavatmal News esakal
विदर्भ

Yavatmal News: अंधश्रद्धेची परिसीमा! पोटाचा त्रास होत असल्याने नवजात शिशूच्या पोटावर बिब्याचे चटके

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ: विज्ञानासह वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली असली तरी मानवी मनावर बसलेला अंधश्रद्धेचा पगडा अगदी खोलवर रुजला आहे. घाटंजी तालुक्यात एका नवजात शिशूला पोटाचा त्रास होत असल्याने पालकांनी ज्येष्ठांच्या सांगण्यावर विश्‍वास ठेवून बिब्बा गरम करून त्याचे चटके दिले.

त्यामुळे नवजात शिशूची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहात गुरफटलेल्या लोकांची मानसिकता बदलण्यासाठी अंधश्रद्घा निर्मुलन समितीसह शासन आपल्या स्तरावरून प्रयत्न करीत आहे. मात्र, जनजागृती आणि अशिक्षितपणा यामुळे अंधश्रद्घा समाजातून बाद होताना दिसत नाही.

घाटंजी तालुक्यातील पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. तिने एका गोड चिमुकलीला जन्म दिला. जन्मानंतर नवजात शिशूची प्रकृती ठिक असल्याने सुटी देण्यात आली.

मात्र, घरी नेल्यावर दोन दिवसांत मुलीला पोटदुखीचा त्रास होत असल्याचे पालकांच्या लक्षात आले. शिशूला रुग्णालयात न नेता गावातील ज्येष्ठ मंडळीच्या सांगण्यावर विश्‍वास ठेवून बिब्याला गरम करून त्याचे चटके दिल्याने नवजात शिशूची प्रकृती अधिकच खालावली.

त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी शिशूला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. रुग्णालयात चिमुकलीवर शर्थीचे उपचार सुरू आहेत. हा प्रकार समोर येताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात आणि यवतमाळ सारख्या ग्रामीण भागात अंधश्रद्धेचे भूत किती मोठ्या प्रमाणात मानगुटीवर बसले आहे, हे लक्षात येते.

बिब्याचे चटके दिल्यामुळे त्या नवजात शिशूला पालकांनी वैद्यकीय रुग्णालयात आणले. प्रकृती अजूनही चिंताजनक असून, त्या नवजात शिशूला वाचविण्यासाठी डॉक्टरांची चमू शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

- डॉ. अजय केशवानी, बालरोग विभागप्रमुख,

वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

या घटनेची माहिती मिळताच पारवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून सर्व माहिती गोळा केली जात आहे. अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार आली नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपास केला जात आहे.

- विनोद चव्हाण, ठाणेदार, पारवा पोलिस ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT