बाभूळगाव : कॉंग्रेसच्या 61 वर्षाच्या कारकिर्दीत भ्रष्टचाराचे कुरण झाले होते. शंभर पैशापैकी जनतेपर्यंत पंधरा पैसेच पोहचते, हे स्वत : माजी पंतप्रधान राजिव गांधी यांनी मानले होते, मात्र २०१४ मध्ये कमळाला दिलेल्या एकामतामुळे भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा घालत जनतेचा पैसा जनतेपर्यंत शंभर टक्के पोहचवून देशात प्रचंड परिवर्तन घडवून आणले .
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक महत्त्वकांक्षी प्रभावी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने अठरा तास काम केले . नऊ वर्षाच्या कारकिर्दीत जगाच्या पाठीवर पाचवी शक्ती म्हणून कमळाचे एक मत प्रभावी ठरले असल्याचे प्रतिपादण महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले .
आज गुरुवारी ( ता . २२ ) रोजी सायंकाळी शहराच्या भारतमाता चौकात झालेल्या भाजप महाजनसंपर्क अभियान जाहीर सभा आयोजीत करण्यात आली . यावेळी प्रमुख वक्ते म्हणून चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते . यावेळी प्रमुख अतिथी राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा . डॉ . अशोक उईके , भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा , माजी आमदार आशिष देशमुख ,
भाजपा माजी जिल्हाध्यक्ष मंगेश रुईकर , राजेंद्र डांगे , प्रदेश कार्यकारणी सदस्य रवि वेलुरकर , मुकुंद कदम , जयदिप सानम , प्रफुल चव्हाण यांची उपस्थिती होती ... चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले , महाराष्ट्रातील जनतेने २०१ ९ मध्ये भाजप - सेनेच्या युतीला जनाधार दिला . मात्र या जनाधाराचा अपमान करत लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची चोरी केली आहे .
उद्धव ठाकरेंना व कांग्रेस राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठी राज्याचे उभरते नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडा शिकविला . राज्यात आणि राज्यात पुन्हा एकदा भाजप - सेना नैसर्गिक युती सत्तेत आणली .
तेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खिशात चार - चार विकासाची पेन भरारी घेत आहे . केंद्र व राज्याचे डबल इंजिनचे शासनाने राज्यात विकासाची गती आणली आहे असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले .
● लोकप्रतिनीधी या नात्याने शासनाच्या योजना प्रभावीरित्या गरजवंतापर्यंत पोहचविल्या ग्रामिण भागातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी हरघर नल से जल ही योजना राबविल्या जात असल्याची माहीती याभागाचे आमदार प्रा . डॉ . अशोक उईके यांनी सभेत दिली आहे . २०१४ नंतर महाराष्ट्र राज्यात विकाला प्रचंड गती देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले .
या विकासाला खंडीत करण्याचा पाप २०१ ९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी केले असल्याची टिका माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली . यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यशैलीवरही आशिष देशमुख यांनी ताशेरे ओढले .
सभेला प्रकाश भूमकाळे , माजी सभापती गौतम लांडगे , चित्तरंजन कोल्हे , विवेक परडखे , नितीन परडखे , नरेंद्र बोबडे , हेमंत ठाकरे , अजाबराव डाखरे , कैलास बोंदरे , अविनाश दहेकर , संजय राठी , गौतम लांडगे , अशोक राऊत , वृंदा पिसे , सुरेश वर्मा , भगिरथ गुप्ता , मो . सलीम , अनिकेत पोहोकार , मयुर पिसे यांची उपस्थिती होती .
यावेळी पोलीस पाटील संघटना , मेंढपाळसंघटना , भोईसमाज क्रांतीदल , तेलीसमाज संघटना , कोलाम संघटना , माळी समाज , जैन समाज संघटना , बेंबळा प्रकल्पग्रस्त आदी संघटनेने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले . सभेचे सुत्रसंचालन भाजप तालुकाध्यक्ष सतिश मानलवार यांनी केले . तर आभार आनंद सोळंके यांनी मानले .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.