उमरखेड (जि. यवतमाळ) : मी व माझे या कोषात जगणाऱ्या मानव जातीला कोरोना महामारीने जमिनीवर आणले.
कोरोना महामारीने संपूर्ण जगभर हाहाकार माजला असताना भारतात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले.
यावेळी देशहिताच्या कार्यात आपलेही कुठेतरी योगदान असावे,आपल्या हातुनही देशसेवा व समाजसेवा व्हावी,याच विचाराने प्रेरित होऊन,या लाॅकडाऊनच्या दरम्यान उमरखेड मधील ध्येयवेड्या तरुणांनी एकत्र येऊन बेवारस,असहाय्य वृध्द,अपंग,निराधार लोक उपाशी राहु नयेत म्हणुन त्यांच्या राहत्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांना जेवण देण्याचे ठरविले व शहरातील भुकेल्यांना माणुसकीचा घास भरविण्याचे ठरविले.
अवश्य वाचा- पतीने आणली सवत, असह्य होऊन तिने घेतले विष
सुरुवातीला या युवकांनी घरी रोजच्या जेवणासोबत थोड्या जास्तीच्या पोळ्या व भाजी केली व ती कागदात गुंडाळून बेवारस,भिकारी,निराधार लोकांना नेऊन दिली,तेव्हा त्यांना त्या अन्नाची अत्यंत गरज असल्याचे दिसुन आले त्यामुळे आता या कार्यात लोकांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी जे शहरात अनेक वर्षापासुन सामाजिक कार्यात योगदान देत आहेत अशा सोशल ग्रुप,शहिद भगतसिंग मंडळ,आदर्श संस्था उमरखेडचे सदस्य अशा सगळ्यांना एकञ आणून सोशल मीडिया व व्हाटसपच्या माध्यमातुन लोकांना आव्हान केले की,गरजुंसाठी आपल्या जेवणासोबत फक्त एक पोळी व भाजी जास्तीची करून आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या घरी येऊन ती गोळा करू व भुकेलेल्या लोकांना नेऊन देऊ. लोकांनी या गोष्टीला भरभरुन प्रतिसाद दिला व आजही देत आहेत. या उपक्रमास "एक पोळी जास्तीची" असे नाव देण्यात आले.
लॉकडाऊन चालू झाल्यापासून आज पर्यंत सरासरी दररोज ६४० पोळ्या व त्याच्या सोबत भाजी जवळपास १६० गरजु ,बेघर,बेवारस, वृद्ध,अपंग लोकांना ते पुरवित आहेत. सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सदस्यांमार्फत वाटप करण्यात येत आहे. मध्यंतरी लोकांकडून डब्याचा ओघ कमी झाला होता , तेंव्हा त्यांनी लोकसहभागातुनच ""कम्युनिटी किचन"" तयार केले. ज्यांना जेवणाचा डबा देणे शक्य नाही त्यांनी धान्य दिले व त्यातुनच स्वत: स्वंयपाक करून ते गरजुंना जेवण देत आहेत .
त्यामुळे लोकांकडुन जेवढे डबे येतात व जेवढे कमी पडतात तेवढे कीचनमधे तयार करीत असल्याने शहरात कोणीही आज उपाशी नाही.
आम्ही उमरखेडकर घेतली खबरदारी!
आमची माणसं,आमची जबाबदारी!
असे आवाहन शहरातील नागरीकांना करीत
एक पोळी जास्तीची" हा उपक्रम उमरखेड पॅटर्न म्हणुन राज्यातील वर्धा , चंद्रपुर नांदेड या जिल्हयात राबविण्यात येत असुन या उपक्रमाने सीमा पार केल्या आहेत .
या उपक्रमासाठी शेवंतराव गायकवाड, राहुल मोहितेवार, वैभव कोडगिरवार,दामोधर इंगोले, अभिजित गंधेवार रामदास काळे,प्रशांत ससाने, किरण लांबटिळे, नितिन जोगदंड हे परिश्रम घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.