Kolhapur Theater Incident: Sambhaji Raje's Comments Spark Controversy, Hasan Mushrif Reacts  esakal
व्हिडिओ | Videos

...तर मी तुमच्या अंगावर येणार; शाहू महाराजांसमोर संभाजीराजेंनी हसन मुश्रीफांना भरला दम, नेमकं काय घडलं? VIDEO पाहा

Sandip Kapde

Sambhaji Raje Creates Controversy at Kolhapur Theater, Shouts at Hasan Mushrif in Front of Shahu Maharaj

कोल्हापूर: ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या निविदेत दोन-तीन टक्क्यांच्या कमिशनचा प्रकार चालणार नाही. काही गडबड घोटाळा झाला तर मी स्वस्थ बसणार नाही. तसा प्रकार घडला तर त्याबाबत तुम्हाला जबाबदार धरून मी तुमच्या अंगावर येणार’, असा इशारा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आज येथे दिला. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते.

संभाजीराजे म्हणाले, ‘नाट्यगृह बांधण्यासाठी सरकारने निधी दिला नाही तर कोल्हापूरकर कमी पडणार नाहीत. शहरातील ऐतिहासिक वास्तूंना एकही प्रोटोकॉल नाही. त्याविरोधात आवाज उठवायला हवा. नाट्यगृहाची पुनर्बांधणी करताना कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट हवा. एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टचा विचार करून नाट्यगृहाचे बांधकाम व्हायला हवे.

नाट्यगृहाची ही इमारत म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा विचार आहे. त्यात अर्धवटपणा चालणार नाही. निविदेत काही कमिशनचा प्रकार घडला तर मी पालकमंत्र्यांना त्याचा जाब विचारणार.’ माजी महापौर आर. के. पोवार यांनी पुनर्बांधणीचे काम लवकर सुरू करावे, अशी सूचना केली. वसंतराव मुळीक यांनी नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीत एक रुपयांचा भ्रष्टाचार होणार नाही, असे सांगत निधी वेळेवर येत नसल्याची खंत व्यक्त केली.

ठेकेदारांना पोसण्याचे काम सुरू

‘नाट्यगृहाची समिती गणेशोत्सव दक्षता समितीसारखी नसावी. या कामात महापालिकेला घेऊ नका. ठेकेदारांना पोसण्याचे काम सुरू आहे. शाहू राजांच्या नावावर निधी आणून ढपला पाडला जात आहे ’, असे मत अशोक पोवार यांनी मांडले. दहा कोटी रुपयांच्या निधीत लचके तोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोण काय म्हणाले..?

इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव : शाहू महाराज यांच्या पुढाकाराने समिती स्थापन व्हावी.

बाबा इंदूलकर : घटनेची सखोल चौकशी करा.

दिलीप देसाई : घटना शंकास्पद असल्याने

तपास सीबीआयकडे द्या.

विजय कोराणे : तांत्रिक सहकार्य करू.

अजय कोराणे : पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ बाहेरून आणावे लागतील.

प्राचार्य डॉ. महादेव नरके : नाट्यगृहाचा मूळ ढाचा कायम ठेवा.

इतिहास अभ्यासक राम यादव : खासबाग केवळ कुस्तीसाठी मर्यादित नाही.

माजी नगरसेवक सत्यजित कदम : नेमक्या खर्चाचा आकडा कळावा.

‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन : निधीची कमरता पडली तर उद्योजक मदत करतील.

सतीश्चंद्र कांबळे : शाहू महाराज यांच्या नेतृत्‍वाखाली समिती व्हावी.

इंद्रजित नागेशकर : आर्किटेक्टससाठी कार्यशाळा घ्या.

हर्षल सुर्वे : सांस्कृतिक खात्याचा निधी मिळावा.

आनंद काळे : दुसरे नाट्यगृहही उभे करा.

गिरीश फोंडे : शाहूकालीन वास्तूंना संरक्षण द्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन संपन्न

Dhule Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट! धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू; सहा जण जखमी

Phullwanti : "असा मिळाला गश्मीरला नरसिंह शास्त्रींचा रोल" ; प्राजक्ता-गश्मीरने केला खुलासा

Yuvraj Singh: धोनी, विराट, रोहित नाही, तर युवीला त्याच्या ड्रीम टीममध्ये पाहिजे हे तीन खेळाडू

Vladimir Putin: ''लंच ब्रेकमध्येही करा सेक्स..'' पुतीन यांनी देशातील तरुणांना का केलं आवाहन?

SCROLL FOR NEXT