Fact Check 
व्हायरल-सत्य

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Fact Check: आभिनेत्री कंगणा राणौतचा सोशल मिडीयावरती एक फोटो शेअर होत आहे. त्या फोटोमध्ये कंगणा एका व्यक्तीसोबत दिसत आहे. त्याच्यासोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम असल्याचा दावा करत हा फोटो शेअर केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Created By: Logically Facts

Translated By: Sakal Digital Team

आभिनेत्री कंगणा राणौतचा सोशल मिडीयावरती एक फोटो शेअर होत आहे. त्या फोटोमध्ये कंगणा एका व्यक्तीसोबत दिसत आहे. त्याच्यासोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम असल्याचा दावा करत हा फोटो शेअर केला जात आहे.

काय आहे दावा?

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणारी अभिनेत्री कंगना रणौत हिचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यामध्ये ती एका व्यक्तीसोबत दिसत आहे. त्याच्यासोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम असल्याचा दावा करत हा फोटो शेअर केला जात आहे. ‘देशाचा शत्रू अबू सालेमसोबत भक्तांच्या सिंहिणीचे काही संस्मरणीय क्षण’ असे व्हायरल झालेल्या फोटेवर लिहण्यात आले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये १ जून रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी हा फोटो शेअर करण्यात आला आहे. मंडीमध्ये कंगना रणौत काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

सोशल मिडीया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. "अंधभक्तांची दिदी, अबू सालेमसोबत काही क्षण घालवताना". आतापर्यंत 33,000 हून अधिक वेळा पाहिली गेली आहे. अर्काईव्ह लिंक येथे पहा. याच दाव्यासह शेअर केलेल्या इतर पोस्ट येथे, येथे आणि येथे पाहू शकता.

मात्र, व्हायरल झालेल्या फोटोत कंगनासोबतची व्यक्ती अबू सालेम नसून मनोरंजन पत्रकार(Entertainment journalism) मार्क मॅन्युएल आहे. त्याचबरोबर हा फोटो 2017 मधला आहे जेव्हा मार्क मॅन्युएलने कंगना राणौतची मुलाखत घेतली होती. नंतर तोच फोटो त्याने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता.

सत्य कसे तपासले?

'Logically Facts' ने Google वर रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर 2017 मधील फेसबुक पोस्ट आढळली (अर्काईव्ह लिंक) ज्यामध्ये तो फोटो आहे. 'Logically Facts 'ला आढळले की, यात अभिनेत्री कंगना रणौतसह मनोरंजन पत्रकार(Entertainment journalism) मार्क मॅन्युएल आहेत.

15 सप्टेंबर 2017 रोजी शेअर केलेल्या फोटोसोबत लिहिलेल्या एका लांबलचक पोस्टमध्ये मार्क मॅन्युएलने लिहिले की, हा फोटो खार (मुंबई) येथील कॉर्नर हाऊसमध्ये काही महिन्यांनंतर कंगनाचा चित्रपट 'सिमरन' च्या दरम्यानच्या सेलिब्रेशनच्या वेळी काढलेला आहे.

त्याच दिवशी मार्क मॅन्युएलनेही हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला (अर्काईव्ह लिंक). मार्क मॅन्युअल हे टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक राहिले आहेत. त्यांनी मिड-डे मध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे आणि हिंदुस्तान टाइम्स आणि हफिंग्टन पोस्ट सारख्या माध्यम संस्थांमध्ये स्तंभलेखक म्हणून काम केलेले आहे.

'Logically Facts'च्या तपासणीत, मार्क मॅन्युएलची 3 ऑक्टोबर 2023 ची पोस्ट सापडली (अर्काईव्ह लिंक), ज्यामध्ये त्याने स्वतःच्या आणि कंगनाच्या फोटोसह काही मथळ्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि लिहिले की काही काँग्रेसजनांनी 2017 मध्ये हफिंग्टन पोस्टसाठी लेख लिहिले होते. (अर्काईव्ह लिंक), त्यांचे आणि कंगनाचे फोटो असे गृहित धरून शेअर केले जात आहेत की भाजपकडे झुकलेली अभिनेत्री दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत दारू पिताना दिसली.

हाच फोटो सोशल मीडियावर वेळोवेळी शेअर केला जात आहे. 1 ऑक्टोबर 2023 रोजी, कंगनाने एका वापरकर्त्याने एक्सवर शेअर केलेल्या त्याच फोटोला उत्तर दिले की,(अर्काईव्ह लिंक), "मला विश्वास बसत नाही की काँग्रेसच्या लोकांना खरोखरच वाटतं की तोच तो भयानक गुंड अबू सालेम आहे जो माझ्यासोबत मुंबईत एका बारमध्ये फिरत होता. ते टाइम्स ऑफ इंडियाचा माजी मनोरंजन संपादक आहे, त्याचे नाव मार्क मॅन्युअल आहे."

'Logically Facts'ने गँगस्टर अबू सालेम आणि पत्रकार मार्क मॅन्युएल यांच्या फोटोंमध्ये तुलना केली, जे स्पष्टपणे दर्शवते की ते वेगवेगळे व्यक्ती आहेत.

कंगना राणौतने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करून व्हायरल दाव्याचे खंडन केले होते. त्याचबरोबर, ही स्टोरी आता अस्तित्वात नाही. पण त्याचा स्क्रीनशॉट अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये पाहायला मिळतो.

निष्कर्ष?

कंगना राणौतचा 2017 चा ज्येष्ठ मनोरंजन पत्रकार मार्क मॅन्युअलसोबतचा फोटो शेअर करण्यात आला असून फोटोत तिच्यासोबत गँगस्टर अबू सालेम उपस्थित असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे.

('Logically Facts' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT