Created By: News Checker
Translated By: Sakal Digital Team
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कथितपणे “गॅरंटी निरर्थकअसतात” असे म्हणत असलेल्या व्हिडिओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष वेधून घेतले आहे.
"मोदी की गॅरंटी" घोषणेवर टीका करण्यासाठी अनेक युजर्सनी शाह यांचे हे वक्तव्य शेअर केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचे शीर्षक देखील "मोदी की गॅरंटी" असे आहे.
या संदर्भात व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये शहा हिंदीत बोलताना ऐकू येतात, “म्हणूनच मी म्हणतो की या गॅरंटी निरर्थक आहेत. ते फक्त निवडणुका संपेपर्यंत यावर बोलतात आणि नंतर विसरून जाता."
दरम्यान अनेक सोशल मीडिया युजर्सनी भाजपचा जाहीरनामा असलेल्या पंतप्रधान मोदींच्या फोटोसह व्हिडिओ शेअर केला आणि असा दावा केला की शाह यांनी “मोदी की गॅरंटी” उघड केली आहे. पण, न्यूजचेकरला असे आढळले की, काँग्रेसच्या निवडणुकीतील आश्वासनांवर टीका करणारे शाह यांचे वक्तव्य संदर्भ बदलून व्हायरल केले जात आहे.
यूट्यूबवर “अमित शाह” आणि “गॅरंटी” या कीवर्डचा शोध घेतल्यानंतर न्यूजचेकर या संकेतस्थळाला 16 मे 2024 रोजीची बिझनेस टुडेचा व्हिडिओ सापडला.
व्हिडिओचे शीर्षक आहे, "काँग्रेसच्या गॅरंटीवर अमित शहा यांची 'चीनी गॅरंटी' म्हणून टीका." यामध्ये एनएनआयच्या स्मिता प्रकाश अमित शहा यांची मुलाखत घेत असल्याचे दिसत आहे.
"गॅरंटीबद्दल बोलत असताना, तुम्ही काँग्रेसच्या गॅरंटींना 'चीनी गॅरंटी' म्हणून संबोधले. ... आपण पीओकेबद्दल बोलत होतो आणि तुम्ही आपल्या संभाषणात चीनचाही उल्लेख केला," असे स्मिता प्रकाश म्हणताना ऐकू येत आहे.
“नाही, मी त्यांना चिनी गॅरंटी त्यांच्या टिकाऊपणाच्या आधारावर दिली. हे खरे नाही,” असे शहा उत्तर देतात.
“मी नुकताच तेलंगणात होतो. तिथल्या स्त्रिया त्यांच्या 12,000 रुपयांची वाट पाहत आहेत... मुली त्यांच्या स्कूटीसाठी... हे आश्वासन राहुल गांधींनी दिले होते, ही त्यांची गॅरंटी होती. आता राहुल गांधींना शोधा...म्हणूनच मी म्हणतो की या गॅरंटी निरर्थक आहेत. ते (काँग्रेस नेते) फक्त निवडणुका संपेपर्यंत बोलतात आणि नंतर विसरतात,” असे अमित शहा पुढे म्हणतात.
हे पाहिल्यानंतर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, व्हिडिओमध्ये शाह काँग्रेस पक्षावर निवडणूक आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करताना दिसत आहेत.
शाह यांच्या मुलाखतीचा हा भाग ANI ने 15 मे 2024 रोजी X वर शेअर केला होता आणि तो खाली पाहिला जाऊ शकतो.
शहा यांच्या “चीनी गॅरंटी” या टिप्पणीचा तपशील देताना, एएनआयच्या एका वृत्तात म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी लोकांना दिलेल्या गॅरंटीबद्दल काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत आणि त्यांनी या संदर्भात त्यांना 'चीनी गॅरंटी' असे म्हटले आहे.
अशा प्रकारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, काँग्रेसच्या निवडणुकीतील आश्वासनांवरील अमित शहा यांनी “मोदी की गॅरंटी” निरर्थक म्हटल्याचा खोटा दावा करण्यासाठी संदर्भबाहेरील वक्तव्य व्हायरल केले गेले आहे.
'न्यूजचेकर' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.