Fact Check Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: भाजपने 1,000 पेक्षा कमी मतांनी 100 मतदारसंघ जिंकल्याचा दावा खोटा; निवडणूक आयोगाची आकडेवारी काय सांगते?

Fact Check: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भाजपने 30 जागांवर 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने आणि 100 मतदारसंघात 1000 पेक्षा कमी मतांनी विजय मिळवला असल्याचा दावा सोशल मिडीयावरती केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Created By: Newschecker

Translated By: Sakal Digital Team

काय आहे दावा?

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भाजपने 30 जागांवर 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने आणि 100 मतदारसंघात 1000 पेक्षा कमी मतांनी विजय मिळवला असल्याचा दावा सोशल मिडीयावरती केला जात आहे.

अशा पोस्ट इथे आणि इथे पाहता येतील.

काय आहे सत्य?

भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटाचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यावर, "Newschecker"ला असे आढळून आले की, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने जिंकलेल्या सर्वात कमी फरकाने 1,587 मते होती. ओडिशाच्या जाजपूर मतदारसंघातून भाजपचे रवींद्र नारायण बेहरा यांनी 5,34,239 मते मिळवून बीजेडीच्या सर्मिष्ठा सेठी (5,32,652) यांचा 1,587 मतांच्या फरकाने पराभव केला होता.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा अन्य कोणताही उमेदवार 1,587 पेक्षा कमी फरकाने विजयी झालेला नाही.

पक्षाचा दुसरा सर्वात कमी फरकाने विजय जयपूरमध्ये झाला होता, जिथे पक्षाचे नेते राव राजेंद्र सिंह यांनी काँग्रेसच्या अनिल चोप्रा यांच्याविरुद्ध 1,615 मतांनी विजय मिळवला. एकंदरीत, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत फक्त 7 भाजप उमेदवारांनी 5,000 पेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळवला.

लोकसभा निवडणूक सर्वात कमी फरकाने कोण जिंकले?

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र दत्ताराम वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. वायकर यांना 4,52,644 मते मिळाली, तर शिवसेनेचे UBT उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांना 4,52,596 मते मिळाली.

त्यामुळे भाजपने 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने 30 जागा जिंकल्याचा आणि 1000 पेक्षा कमी मतांच्या फरकाने 100 जागा जिंकल्याचा व्हायरल दावा खोटा आहे.

निष्कर्ष

भाजपने 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने 30 जागा जिंकल्याचा आणि 1000 पेक्षा कमी मतांच्या फरकाने 100 जागा जिंकल्याचा व्हायरल दावा खोटा आहे.

('Newschecker' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना..! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब

Nagpur South Assembly Election 2024 Result: प्रतिष्ठेची लढत भाजपने जिंकली, नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे मोहन मते यांचा विजय

Sports Bulletin 23rd November: पर्थ कसोटीत भारताकडे भक्कम आघाडी ते उद्या आयपीएल २०२५ चा मेगा ऑक्शन रंगणार

Rohit Pawar Won Karjat-Jamkhed Assembly Election 2024 Result Live: रोहित पवारांचा अटीतटीचा विजय; राम शिंदेंना दुसऱ्यांदा दिली मात

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT