Fact Check Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check : एकनाथ शिंदेंनी रामनवमीला मटण खाल्लं नाही! व्हायरल होत असलेला 'तो' दावा खोटा

Fact Check : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

वृत्तसंस्था

Created By: पीटीआय

Translated By : सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोशल मिडीयावरील फूड ब्लॉगर कामिया जानीसोबत जेवण करताना दिसत आहे. सोशल मिडीयावर हा फोटो शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की शिवसेना (शिंदे गट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामनवमीच्या दिवशी मटण खाल्ले आहे.

पीटीआय फॅक्ट चेकमध्ये व्हायरल होत असलेला फोटो आणि सोबतच केलेला दावा खोटा असल्याचे आढळले आहे. एकनाथ शिंदे आणि कामिया जानी यांनी रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रातील उमरेड गावातील स्थानिक महिलांनी बनवलेल्या खास शाकाहारी सावजी जेवणाचा आस्वाद घेतला होता. त्याचे जेवतानाचे फोटो सोशल मीडियावर खोट्या दाव्यांसह शेअर केले जात आहे.

काय आहे दावा?

'राहुल गांधी ऑफ अमेठी' या फेसबुक पेजवर 18 एप्रिल रोजी व्हायरल झालेला फोटो पोस्ट करण्यात आला आहे. सोबत लिहले आहे की, “शिंदे रामनवमीच्या दिवशी मटण खात आहेत. सनातन धर्माच्या खोट्या रक्षकांनो, भगवान रामाचा एवढा अपमान झाला आहे, तुमच्या भावना झोपल्या आहेत का? उद्या किती चॅनेल्सवर यावर चर्चा होणार? पोस्टची लिंक, संग्रहण लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर, युनायटेड विथ आयएनसी(United With INC) नावाच्या सोशल मिडीया वापरकर्त्याने लिहिले आहे की, “कालच, पीएम मोदी विरोधी नेत्यांनी मांस खाल्ल्याबद्दल बोलत होते. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामनवमीच्या शुभ दिवशी नागपूरचे सावजी मटण चाखायला लावले. भाजपमध्ये सर्व हिंदूविरोधी आहेत. ढोंगीपणालाही मर्यादा असते. पोस्टची लिंक, संग्रहण लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकाच दाव्यासह अनेक फोटो व्हायरल झाले आहे, जे येथे, येथे आणि येथे क्लिक करून पाहता येऊ शकतील.

कशी केली Fact Check?

व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी 'पीटीआय' डेस्कने आधी कामिया जानीचे सोशल मीडिया अकाउंट शोधले. 'पीटीआय'ला तिच्या इंस्टाग्राम पेज ‘कर्लीटेल्स’ वर पूर्ण व्हिडिओ सापडला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही व्हिडिओमध्ये टॅग करण्यात आले आहे.

18 एप्रिल रोजी इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अतिशय स्वादिष्ट शाकाहारी सावजी जेवणाचा आस्वाद घेतला." व्हिडिओची लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पाहा.

त्यानंतर पुढे लिहले होते की, महाराष्ट्रातील उमरेड गावातील स्थानिक महिलांनी आमच्यासाठी अतिशय खास शाकाहारी सावजी जेवण बनवले होते. ते खूप चवदार होते. ”

'पीटीआय' डेस्कने संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवलेल्या ताटात रोटी, कोशिंबीर आणि काही भाज्या दिसत होत्या. कामिया जानी यांनी एकनाथ शिंदे यांना ताटात ठेवलेल्या पदार्थांबद्दल विचारले असता ते म्हणाले, “हे वांग्याचे भरीत आहे, ही वांग्याची भाजी, ही पाटवडी(वडी) आहे.”

तपासादरम्यान, 'पीटीआय'ला कर्ली टेल्सच्या वेबसाइटवर यासंबंधीचा अहवाल देखील सापडला. रामनवमीच्या निमित्ताने कामिया जानी हीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शाकाहारी सावजी पदार्थाचा आस्वाद घेतल्याचे वृत्त आहे. कामिया जानीला उमरेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत आनंदोत्सव साजरा करण्याचा आनंद मिळाला. संपूर्ण दिवस अप्रतिम गेला आणि गावातील स्थानिक महिलांनी बनवलेल्या शाकाहारी जेवणामुळे संपूर्ण दिवस अप्रतिम झाला. येथे क्लिक करून संपूर्ण अहवाल वाचा.

'पीटीआय'ला हा व्हिडिओ कर्ली टेल्सच्या YouTube चॅनेलवर देखील सापडला. लवकरच व्हिडिओचा पूर्ण भाग चॅनलवर अपलोड केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. येथे क्लिक करून व्हिडिओ पाहा.

'पीटीआय'च्या आतापर्यंतच्या तपासावरून हे स्पष्ट झाले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामनवमीच्या दिवशी मांसाहार घेतला नाही, तर महाराष्ट्रातील उमरेड गावातील स्थानिक महिलांनी बनवलेला खास शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला होता. त्यांचे जेवतानाचे फोटो सोशल मीडियावर खोट्या दाव्यांसह शेअर केले जात आहेत.

निष्कर्ष

रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मटण खाल्ल्याचा दावा करत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने तपास केला आणि त्यामध्ये हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले आहे. एकनाथ शिंदे आणि कामिया जानी यांनी रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रातील उमरेड गावातील स्थानिक महिलांनी तयार केलेल्या खास शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला होता.

'पीटीआय' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT