Fact Check Sakal
व्हायरल-सत्य

Fact Check: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांचे 10 वर्षे जुने वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल

राहुल शेळके

Maharashtra Haryana Assembly Elections Date: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही राज्यांमध्ये 15 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 सप्टेंबर रोजी निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे. दाव्यानुसार 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

हा व्हायरल दावा आजतक न्यूज चॅनलचा लोगो असलेल्या ग्राफिक्ससह शेअर केला जात आहे, ज्यामुळे अनेक युजर्स तो दावा खरा असल्याचे मानत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर हा फोटो शेअर करत आहेत.

दावा:

फेसबुक युजर्सनी 22 जुलै रोजी व्हायरल पोस्ट शेअर करताना लिहिले, ''हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, हरियाणा विधानसभा निवडणुका 15 ऑक्टोबर रोजी होणार आहेत आणि मतमोजणी 19 ऑक्टोबर रोजी होईल."

फेसबुकवरील (Facebook) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

तथ्य :

व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट पाहिली, जिथे आम्हाला दाव्याशी संबंधित कोणतीही माहिती आढळली नाही.

अधिक तपास केल्यास अधिकृत सोशल मीडिया हँडलचा शोध घेतला. आम्हाला आयोगाने 24 जुलै रोजी शेअर केलेली पोस्ट आढळली, ज्यात व्हायरल दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले आहे की, "महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकासंदर्भात एक मेसेज व्हॉट्सॲपवर शेअर केला जात आहे. हा मेसेज खोटा आहे. निवडणूक आयोगाने अशी कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. आयोग पत्रकार परिषदेद्वारे निवडणुकीच्या तारखा जाहीर करतो.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबरला आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. हरियाणातील निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने राज्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू केल्या आहेत. हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयार करण्याची घोषणाही निवडणूक आयोगाने केली आहे.

व्हायरल दाव्याशी संबंधित कीवर्ड गुगलवर शोधले. तर 'आज तक'च्या वेबसाइटवर 12 सप्टेंबर 2014 रोजी प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्याचं सांगण्यात आलं. दोन्ही राज्यांमध्ये 15 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या रिपोर्टमध्ये व्हायरल ग्राफिक्सही पाहता येतील.

हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबर रोजी मतदान झाले आणि दोन्ही राज्यांमध्ये 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली.

निष्कर्ष

'सकाळ'ने या दाव्याची तपासणी केली आणि तो खोटा असल्याचे आढळले. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा भारतीय निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या नाहीत, असे तपासणीत आढळून आले आहे. व्हायरल ग्राफिक्स 10 वर्षे जुना आहे. युजर्स सध्या 2014 मध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे ग्राफिक्स चुकीच्या दाव्यांसह शेअर करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन संपन्न

Dhule Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट! धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू; सहा जण जखमी

Phullwanti : "असा मिळाला गश्मीरला नरसिंह शास्त्रींचा रोल" ; प्राजक्ता-गश्मीरने केला खुलासा

Yuvraj Singh: धोनी, विराट, रोहित नाही, तर युवीला त्याच्या ड्रीम टीममध्ये पाहिजे हे तीन खेळाडू

Vladimir Putin: ''लंच ब्रेकमध्येही करा सेक्स..'' पुतीन यांनी देशातील तरुणांना का केलं आवाहन?

SCROLL FOR NEXT