Misleding Viral Video Of Dharavi Murder Case  Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येचा व्हिडिओ दिशाभूल करणारा, पोलिसांनी सांगितले घटनेमागील सत्य

आशुतोष मसगौंडे

Created By: Boom

Translated By: Sakal Digital Team

मुंबईतील धारावीमध्ये वैयक्तिक वादातून अरविंद वैद्य (वैश्य) या तरुणाची भर रस्त्यात हत्या करण्यात आली, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. अशात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कोयत्याने मारहाण करताना दिसत आहे.

यानंतर Boom या संकेतस्थळाने व्हिडिओबाबतची सत्यता तपासली. त्यानंतर असे समोर आले की, अरविंद वैद्य (वैश्य) या तरुणाची हत्या झाली हे खरे आहे. मात्र, व्हायरल होत असलेला व्हिडिओचा आणि अरविंद वैद्य (वैश्य) याच्या हत्येचा काहीही संबंध नाही.

दावा

एक्स, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावरच दुसऱ्या व्यक्तीला कोयत्याने मारहाण करत असून, रस्त्यावर पडलेला व्यक्ती कोयत्याच्या हल्ल्यामुळे रक्तबंबाळ झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान हा व्हिडिओ शेअर करताना काही युजर्सनी लिहिले आहे की, "मुंबईमध्ये बजरंग दलाचा कार्यकर्ता अरविंद वैद्य याचा काल रात्री धर्मरक्षासाठी गेला. त्याची जिहाद्यांनी भर रस्त्यात हत्या केली. हिंदूंनो डोळे उघडा, एकत्र या."

एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Misleding X post And Video Of Dharavi Murder Case

सत्य

BOOM ने व्हिडिओमध्ये पाहिलेल्या तपशिलांच्या आधारे संबंधित कीवर्ड शोधला आणि तेव्हा त्यांना 19 जुलै 2024 रोजी 'द इंडियन एक्सप्रेस'ने प्रकाशित केलेली एक बातमी सापडली. ज्यामध्ये घटनेच्या स्क्रीनशॉटचा समावेश होता.

बातमीत म्हटले आहे की, "ही घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे, वायएसआरसीपी (युवजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टी) च्या युवा नेत्याची पालनाडू जिल्ह्यातील विनुकोंडा शहरातील मुख्य रस्त्यावर हत्या करण्यात आली."

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात पुढे म्हटले आहे की, "शेख रशीद, 27, हा वायएसआरसीपीचा पालनाडू जिल्ह्याच्या युवा विंगचा सचिव होता. पोलिसांच्या मते, बुधवारी रात्री शेख जिलानी नावाच्या एका व्यक्तीने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला."

YSRCP Youth Leader Killed

26 जुलै रोजी एका फेसबुक पोस्टमध्ये, पालनाडू पोलिसांनी जाहीर केले की त्यांनी जिलानी आणि इतर सहा जणांना हत्येप्रकरणी अटक केली आहे. क्रूर हत्येच्या घटनेबाबत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे तेलुगूमधील पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेबाबत मुंबई पोलिसांनीही एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की,"मुंबईतील रस्त्यांवर एका व्यक्तीची कोयत्याने हत्या करण्यात आल्याचा दावा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. वरील घटना मुंबई किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात घडलेली नाही. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि व्हिडिओ शेअर करणे टाळावे."

निष्कर्ष

तेलंगना पोलीस यांची फेसबुक पोस्ट आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून हे स्पष्ट होते की, या घटनेचा आणि मुंबईतील धारावीत झालेल्या अरविंद वैद्य यांच्या हत्येचा काहीही संबंध नाही. त्याचबरोबर इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना तेलंगनातील आहे.

'बूम' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन संपन्न

Dhule Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट! धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू; सहा जण जखमी

Phullwanti : "असा मिळाला गश्मीरला नरसिंह शास्त्रींचा रोल" ; प्राजक्ता-गश्मीरने केला खुलासा

Yuvraj Singh: धोनी, विराट, रोहित नाही, तर युवीला त्याच्या ड्रीम टीममध्ये पाहिजे हे तीन खेळाडू

Vladimir Putin: ''लंच ब्रेकमध्येही करा सेक्स..'' पुतीन यांनी देशातील तरुणांना का केलं आवाहन?

SCROLL FOR NEXT