False News About PM Modi Using Bad Words In Rally Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: निवडणुकीच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी अपशब्द वापरल्याचा दावा खोटा

PM Narendra Modi: व्हायरल व्हिडिओ 2019 चा असल्याचे आढळले. पाण्याच्या संघर्षावर पंतप्रधान मोदी गुजराती भाषेत बोलत होते. त्यांनी भाषणात कोणतीही अनुचित भाषा वापरली नाही.

सकाळ वृत्तसेवा

Created By: Boom

Translated By: Sakal Digital Team

लोकसभा निवडणूक 2024 चा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत त्यांनी आपल्या भाषणात अपशब्द वापरल्याचा दावा केला जात आहे.

बूमने केलेल्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल झालेला व्हिडिओ 2019 चा आहे. व्हिडिओमध्ये पीएम मोदी गुजरातीमध्ये पाण्यासाठीच्या संघर्षावर बोलत होते. त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात कोणतीही अनुचित भाषा वापरली नाही.

या 15 सेकंदाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पीएम मोदी गुजराती भाषेत पाण्याच्या संघर्षावर बोलताना दिसत आहेत. व्हिडीओवरील मजकुरात 'मोदी एका सभेत बीसी म्हणाले' असे लिहिलेले दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना एका एक्स युजरने हिंदीत लिहिले की, 'परमात्मा का भेजा हुआ यह 'कन्विन्स्ड' प्रतिनिधि 'पर्पसफुली' इतनी शालीन भाषा मंच से बोलता है, या ससुरा महज संयोग है?'

'एक्स'वरील (X) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

हा व्हिडीओही याच दाव्याने फेसबुकवर (Archieve) व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान मोदींबद्दल व्हायरल होत असलेला दावा.

सत्य

व्हायरल व्हिडिओमध्ये 'द क्विंट' या न्यूज वेबसाईटचा लोगो आणि व्हिडिओचे शीर्षक 'पीएम मोदींनी पाटण, गुजरातमध्ये रॅलीला संबोधित केले' असे लिहिले आहे.

बूमने यावर गुगलवर सर्च केले. 'द क्विंट'च्या यूट्यूब चॅनलवर गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा हा व्हिडिओ बूमला सापडला. हा व्हिडिओ 21 एप्रिल 2019 चा आहे.

43 मिनिटे 19 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात की, त्यांचा पक्ष सत्तेत आल्यास पाण्यासाठी वेगळे मंत्रालय तयार केले जाईल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणाची पुढची ओळ आहे, ज्यामध्ये त्यांनी अपशब्द वापरल्याचा दावा केला जात आहे.

गुजरातीतील मूळ ओळ आहे, "લોકો એમ કહે છે ભાવિશ માં લડાઈ પાની ની થવા ની છે. બાધા કો છો પાની ની લડાઈ થવાની છે તો પછી અમે અત્યારે થી પાની પેલા પાર કેમ ના બાંધીએ."

अनुवाद असा आहे की, "लोक म्हणतात की भविष्यात पाण्यावरून भांडण होईल. जर प्रत्येकजण असे म्हणत असेल, तर आपण आत्तापासूनच पाण्याचा वापर व्यवस्थित करायला हवा."

पंतप्रधान मोदींनी भाषणाच्या शेवटच्या भागात एक गुजराती म्हण उद्धृत केली, 'पाणी पार बंधन' ज्याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आधीच तयारी करणे, जी पीएम मोदी जल मंत्रालयाच्या प्रस्तावाच्या संदर्भात वापरत होते. व्हायरल झालेल्या भाषणात कुठेही अपशब्द वापरताना ऐकू येत नाही.

निष्कर्ष

'बूम' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT