Bhagwant Mann fake video Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना मारहाण झाल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडीओ खोटा

सकाळ वृत्तसेवा

Created By: Boom

Translated By: Sakal Digital Team

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्यामध्ये काही लोक एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडिओसह दावा केला जात आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना नागरिकांनी मारहाण केली आहे.

दरम्यान, BOOM या संकेतस्थळाने याबाबत सत्य तपासले तेव्हा हा दावा खोटा असल्याचे आढळले.

व्हिडिओमध्ये भगवंत मान नसून युवा जाट सभा जम्मू-काश्मीरचे अध्यक्ष अमनदीप बोपाराय आहेत. फेसबुकवर व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने लिहिले की, 'भगवंत मान यांना आज मारहाण झाली.'

'फेसबुक'वरील (Facebook) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

सत्य

बूमने या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासली तेव्हा त्यांना आढळले की, व्हायरल व्हिडिओसह केला जात असलेला दावा खोटा आहे. व्हिडिओमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नसून युवा जाट सभेचे अध्यक्ष आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम अकाउंटचे नाव @NEWS_MAHARAJA_ANANDPUR_ असे लिहिले आहे. हे पाहिल्यानंतर, ते या Instagram खात्यावर गेले जिथे त्यांना 4 मे रोजी अपलोड केलेला व्हायरल व्हिडिओ आढळला. (Archieve Version)

कॅप्शनमध्ये व्हिडिओबद्दल कोणताही तपशील नव्हता, पण, बूमला पोस्टवर दोन कमेंट्स आढळल्या. ज्यात लिहिले होते की, हा व्हिडिओ जम्मूमधील युवा जाट सभेच्या अध्यक्षांना मारहाण करतानाचा आहे.

यानंतर बूमने संबंधित कीवर्डच्या मदतीने फेसबुकवर सर्च केले. तेथ त्यांना 13 एप्रिल 2024 रोजी जेके रोजाना न्यूजच्या फेसबुक पेजवर अपलोड केलेला व्हिडिओ आढळला.

यामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओचे फुटेज दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'ब्रेकिंग जम्मू - युवा जाट सभेच्या रॅलीत गोंधळ, अमनदीप सिंग बोपाराय यांच्यावर हल्ला' (Archieve Version)

या प्रकरणी युवा जाट सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत अध्यक्ष अमनदीप सिंग बोपाराय यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.

मनदीप सिंग बोपाराय यांनी 17 मे रोजी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली, 'पंजाबमधील विरोधी पक्षाने जम्मूच्या गोल गुजराल कॅम्पमध्ये माझ्यावर झालेला हल्ल्या आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर झाला असल्याचा दावा करणारा दावा खोटा आहे.'

निष्कर्ष

आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना नागरिकांना मारहाण केल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचे बूमच्या तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे.

'बूम' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT