Chinas Express Way Claimed As of Nagur And Mumbai Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: चीनच्या डबल डेकर 'एक्स्प्रेस वे'चा व्हिडिओ नागपूर, मुंबईतील भाजपचे विकास काम असल्याचे सांगत होतोय व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

Created By: News Checker

Translated By : Sakal Digital Team

डबल डेकर एक्स्प्रेस वे रोडचा व्हिडिओ नागपूर आणि मुंबईचा असल्याचे सागंण्यात येत असून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

दावा

डबल डेकर एक्स्प्रेस वे रोडचा व्हिडिओ नागपूर आणि मुंबईचा असल्याचे दाखवण्यात आले असून हे विकासकाम भाजपला चारशेच्या पुढे नेणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर या डबल डेकर एक्स्प्रेस वे रोडचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला जात आहे.

एक्स पोस्टचे अर्काईव्ह येथे पाहा.

Chinas Expressway Claimed As Nagpurs

सत्य

नागपूर आणि मुंबईतील भाजप सरकारच्या विकासकामांबद्दलचा व्हिडिओ असल्याची पडताळणी करण्यासाठी, 'न्यूज चेकर'ने प्रथम व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सची रिवर्स इमेज सर्च केले. हे करत असताना, 'न्यूज चेकर'ने अनेक सोशल मीडिया पोस्ट आढळल्या ज्यात व्हायरल व्हिडिओ चीनच्या ग्वांगडोंगमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. 4 एप्रिल 2024 रोजीच्या YouTube पोस्टमधील व्हिडिओला कॅप्शन दिले आहे: “चीनमध्ये सरकारी अधिकारी नागरीकांच्या समस्या सोडवण्यावर त्यांचा वेळ केंद्रित करतात.”'चायना ट्रिप' नावाच्या यूट्यूब चॅनेलवरील या व्हिडिओसोबतच्या पोस्टमध्ये 'ग्वांगडोंगचा डबल-डेकर एक्सप्रेसवे' असे वर्णन करण्यात आले आहे.

Chinas Express Way Claimed As of Nagur And Mumbai

पुढील तपासात, या माहितीच्या आधारे, 'न्यूज चेकर'ने संबंधित कीवर्डसाठी Google शोधले. त्यामध्ये, 'न्यूज चेकर'ने बेलफास्ट, युनायटेड किंगडम येथे काउंसल जनरल म्हणून काम करणाऱ्या चिनी राजनयिक आधिकारी झांग मेफांगची या व्हिडिओसह एक पोस्ट आढळली.

2 एप्रिल 2024 रोजी त्यांच्या अधिकृत X खात्यावरून या व्हिडिओसह पोस्टला कॅप्शन दिले आहे, “चीनमधील पायाभूत सुविधांच्या जलद विकासाचा अनुभव घेऊया… ग्वांगडोंगमधील हा डबल-डेकर एक्स्प्रेसवे शहरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी करतो”.

तपासादरम्यान, चीन दूतावास-मनिलाच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हायरल व्हिडिओ देखील सापडला. 4 एप्रिल 2024 रोजी केलेल्या पोस्टमध्ये त्याचे वर्णन 'Guangdong's Double Decker Expressway' असे देखील करण्यात आले आहे. ग्वांगडोंग हा दक्षिणपूर्व चीनमधील एक किनारपट्टी प्रांत आहे. जो हाँगकाँग आणि मकाऊच्या सीमेवर आहे. या माहितीवरून व्हिडिओत दिसणारे रस्ते हे नागपूर मुंबईचे नसल्याचे स्पष्ट झाले.

Chinas Express Way Claimed As of Nagur And Mumbai

निष्कर्ष

'न्यूज चेकर'ने केलेल्या तपासणीत (Fact Check) आढळले की, व्हायरल दावा खोटा आहे, व्हिडिओमध्ये दिसणारा डबल डेकर एक्सप्रेस वे चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील आहे.

'न्यूज चेकर' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT