Fact Check about dubai letter  sakal
व्हायरल-सत्य

Fact Check : लोकसभा निवडणुकीसाठी परदेशातून मतदानासाठी आलेल्या मुस्लिमांना मदत जाहीर करणारे ते व्हायरल पत्र खोटे

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या काही दिवस आधी पत्र व्हायरल

वृत्तसंस्था

Created By: News checker

Translated By : Sakal Digital Team

मुंबई: सोशल मीडियावर सध्या एक पत्र चांगलेच व्हायरल होत आहे. त्यासोबतच्या मजकुरात असा दावा केला गेला आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी दुबईतून मतदानासाठी आलेल्या मुस्लिमांनी काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी गेलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. मात्र न्यूज चेकर या 'फॅक्ट चेक' करणाऱ्या कंपनीने या दाव्याची सत्यता तपासली आहे. ज्या पत्राचा संदर्भ देत हा दावा केला जातो आहे, ते पत्रच मुळात खोटे असल्याचे या 'फॅक्ट चेक' मधून समोर आले आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. या दरम्यान अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत. लोकसभेचे तिसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान ७ मे २०२४ रोजी संपन्न झाले. गुजरात २५ , कर्नाटक १४, महाराष्ट्र ११, उत्तर प्रदेश १०, मध्य प्रदेश ९, छत्तीसगढ़ ७, आणि ५ अशा एकूण ९३ जागांवर मतदान घेण्यात आले. यादरम्यान ६२.१ टक्के मतदान झाले.

जाणून घेऊया हे सर्व प्रकरण नेमके काय..

दावा काय केला आहे?

व्हायरल पत्र इंग्रजीमध्ये असून " असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम" या लेटरहेडवर आहे. यावर दुबईचा पत्ता असून २९ एप्रिल २०२४ ची तारीख आहे.

ज्या पत्राचा संदर्भ देत हा दावा केला आहे त्या पत्रातील मजकूराचे मराठी भाषांतर असे आहे की, असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम (दुबई) ने कर्नाटक आणि अन्य राज्यांमध्ये भारताच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मुस्लिमांना तिकीट बुकिंग आणि आधीपासून तिकीट बुक केलेल्या लोकांसाठी पूर्ण आर्थिक सूट देत आहे. यामागचा उद्देश फॅसिस्ट प्रवृत्तींना हरवणे आणि मुस्लिमांचे खरे मित्र असणाऱ्या काँग्रेसला जिंकून देणे.

याशिवाय पत्रात कर्नाटक ते हुबळी, कारवार आणि शिमोगा जिल्ह्यासाठी तीन वेगवेगळे मोबाईल क्रमांक देखील जाहीर करण्यात आले आहे. जे तुम्हाला 'अर्काइव्ह व्हर्जन' मध्ये पाहता येऊ शकतात.

फोटो सौजन्य : Arun Pudur (X post)

Fact check

तथ्य तपासणीत काय आढळले?

पुरावा १

'न्यूजचेकर' ने या व्हायरल दाव्यामागील सत्य तपासण्यासाठी ज्या संघटनेच्या नावे हे पत्र व्हायरल झाले आहे त्या संघटनेचा शोध घेतला. मात्र या संघटनेची कोणतीही माहिती इंटरनेटवर मिळाली नाही.

पुरावा २

दुसरा महत्वाचा पुरावा न्यूजचेकरला मिळाला. त्यामध्ये या पत्रात नमूद केलेला संघटनेचा पत्ता हा दुबई मधील पाकिस्तानच्या दूतावासाचा आहे.

fact check

पुरावा ३

या पत्रात जे दूरध्वनी क्रमांक दिले आहेत त्यातील सर्वात पहिल्या नंबरवर फोन केला असता, हा क्रमांक दुबईतील एक कॉफी मशीन चालविणाऱ्या कंपनीच्या नावे नोंदणी केलेला होता. जो त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर देखील जाहीर केलेला होता. तसेच त्या नंबर वरील व्यक्तीला फोन करून विचारले असता माझा याच्याशी काही संबंध नसल्याचे देखील त्याने सांगितले.

तसेच अन्य दोन क्रमांकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे देखील न्यूज चेकर कडून सांगण्यात आले आहे.

निष्कर्ष :

तीनही पुराव्यांच्या तपासणीनंतर 'न्यूज चेकर' ने हे पत्र आणि हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

'News checker' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT