Fake Video Of Army During Loksabha Election
Fake Video Of Army During Loksabha Election Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: लष्कराचे जवान मतदानात गैरप्रकार करत असल्याच्या दाव्यासह व्हायरल होणारा व्हिडिओ पाच वर्षे जुना

सकाळ वृत्तसेवा

Created By: News Checker

Translated By: Sakal Digital Team

देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओसह एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये दावा करण्या आला आहे की, लष्कराच्या जवणांना मतदानात गैरप्रकार करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान न्यूजचेकरने या संपूर्ण दाव्यामागीत सत्य तपासल्यानंतर समोर आले की, हा व्हायरल व्हिडिओ 2019 मधील मध्य प्रदेशातील जबलपुरचा आहे. त्यावेळी काही लोकांनी आरोप केला होता की, भारतीय लष्करातील जवनांनी भाजपसाठी मतांचा गैरप्रकार केला आहे.

दावा

भारतीय जवानांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जवळपास 2 मिनिट 14 सेकंदांचा आहे. ज्यामध्ये लष्कराची वर्दी घातलेल्या लोकांवर बोगस मतदान केले असल्याचा आरोप कण्यात आला आहे.

व्हायरल व्हीडिओसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “लोकशाही संपली आहे, हुकूमशहाने इतका खालचा स्तर गाठला आहे की, बनावट मत देण्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना पराभवाची भीती आहे. जर तुम्ही चांगले काम केले असते तर तुम्हाला हे करावे लागले नसते."

'एक्स'वरील (X) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

खोटा दावा करणारी एक्स पोस्ट.

सत्य

न्यूजचेकरने व्हायरल व्हिडिओची तपासणी करण्यासाठी व्हिडिओ शेअर करणारे काही ट्विट शोधले आणि त्यामध्ये असे आढळले की, काही युजर्सनी तो व्हीडिओ 2019 मधील असल्याचे c म्हटले आहे.

यानंतर, न्यूजचेकरने जेव्हा संबंधित कीवर्डच्या मदतीने Google वर शोधले तेव्हा त्यांना मे 2019 मध्ये केलेल्या अनेक फेसबुक पोस्ट आढळल्या, ज्यामध्ये हा व्हिडिओ होता.

व्हायरल व्हिडिओ 2019 मधील असल्याचे सांगणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट.

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने 1 मे 2019 रोजी केलेली एक पोस्टीही न्यूजचेकरला आढळली, "ज्यामध्ये म्हटले आहे, मध्य प्रदेशातील जबलपूर येथील लष्करी अधिकाऱ्यांनी 29 एप्रिल रोजी सामान्य मतदारांचे मतदार ओळखपत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणे, तेथील छावणीत तैनात असलेल्या लष्करी मतदारांना अडथळा आणणे आणि लष्कराची प्रतिमा खराब करण्यासाठी व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे."

ही पोस्ट पाहाता सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2019 मधील असल्याचे स्पष्ट होत आहे.

निष्कर्ष

न्यूजचेकरने केलेल्या या तपासात लष्कराचे जवान 2024 लोकसभा निवडणुकीत बोगस मतदान करत आहेत की नाही हे शोधून काढता आले नसले तरी, तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल झालेला व्हिडिओ जुना असून मे 2019 मध्ये तो इंटरनेटवर प्रथम अपलोड करण्यात आला होता.

'न्यूजचेकर' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Hit and Run: गर्लफ्रेंडच्या चौकशीनंतर मिहिर शहाला अटक! पोलिसांनी कसा रचला सापळा?

IND vs ZIM, 2nd T20I: अभिषेकचं शतक, तर ऋतुराजचीही तुफानी फटकेबाजी; भारताने झिम्बाब्वेविरुद्ध ठोकल्या विश्वविक्रमी धावा

Worli Hit And Run: आरोपी मिहीरच्या प्रेयसीची चौकशी, वडील अन् ड्रायव्हर ताब्यात... मुंबईच्या हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

Viral Video : 'अंगारो' मॅशअपवर थिरकल्या अनुपमा आणि संजना ; अनिरुद्धची इथेही लुडबूड, व्हिडीओ झाला व्हायरल !

Ashadhi Wari : काटेवाडीमध्ये तुकोबारायांच्या पालखीला मानाच्या मेंढ्यांचे पहिले रिंगण; सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी

SCROLL FOR NEXT