Created By: Newsmeter
Translated By : Sakal Digital Team
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी श्रीनगरमध्ये मतदान होणार असताना, एक पोलीस वाहन मोटरसायकलस्वाराला धडकवून त्याला पकडत असल्याचे दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा
या व्हिडिसोबत केलेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, "जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये एका दहशतवाद्याला अटक करताना कमांडो."
एक्सवर पोस्ट शेअर करत एका युजरने लिहिले की, "पाहा लष्कराच्या कमांडोने कसे पकडले. हा दहशतवादी आपल्या जाकेटमध्ये लपवलेली शस्त्रे काढण्याच्या प्रयत्नात असताना एक कमांडे पळत आला आणि त्याने दहशतवाद्याला अशी लात घातली की तो तोंडावर पडला."
'एक्स'वरील (X) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यूजमीटर या संकेतस्थळाने यामागील सत्य तपासले. त्यांननंतर असे आढळले की, हा व्हिडिओ श्रीनगरचा नसून ब्राझीलचा आहे.
हा व्हिडिओ पूर्णपणे तपासल्यानंतर असे दिसून आले की, व्हायरल व्हिडिओमधील पोलिसांचे वाहन भारतीय पोलीस वाहनापेक्षा वेगळे दिसते आणि पोलिसांचे सायरन देखील वेगळे आहे.
व्हिडिओच्या कीफ्रेमची रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर, न्यूजमीटरला 3 ऑगस्ट 2021 रोजी RIC Notícias 24h, RIC Notícias या ब्राझिलियन न्यूज चॅनलने पोस्ट केलेला पूर्ण व्हिडिओ सापडला. त्यांच्या अहवालानुसार, व्हिडिओमध्ये पोलीस एका किशोरवयीन मुलाला पकडताना दाखवले आहेत. तो मुलगा वेगात गाडी चालवत होता व त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते.
पुढे न्यूजमीटरला 2 ऑगस्ट 2021 रोजी ओबेमडिटो या न्यूज पोर्टलने डेली मोशनवर पब्लिश केलेला व्हिडिओ देखील आढळला. पोलिसांच्या पाठलागात मोटारसायकलवरून पडल्यानंतर या मुलाला ताब्यात घेण्यात आले. याबरोबर दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, ही घटना ब्राझीलमधील पेरोलाच्या मध्यवर्ती भागातील आहे.
ब्राझीलमधील इस्टो या पोर्तुगीज वृत्तपत्राने 17 वर्षीय मुलाला ब्राझीलमधील पेरोला येथे ताब्यात घेतल्याचे वृत्त दिले आहे. त्यात मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
न्यूजमीटरने केलेल्या फॅक्टचेकमधून असे समोर आले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांला अटक करत असल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ ब्राझीलमधील आहे. त्यामुळे सोशल मीडिया युजर करत असलेला दावा खोटा आहे.
'न्यूजमीटर' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.