Yogi Aditynath Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: "देशातील संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क," आदित्यनाथ खरचं असं म्हणाले होते का? जाणून घ्या सत्य

Yogi Aditynath: व्हिडिओद्वारे असा दावा केला जात आहे की, ‘उत्तर प्रदेशातील पराभवानंतर योगी आदित्यनाथ यांचे सुर बदलले.’

सकाळ वृत्तसेवा

Created By: Newschecker

Translated By: Sakal Digital Team

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 15 सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ असे म्हणताना दिसत आहेत की, ”देश के संसाधनों पर पहला हक़ मुसलमानों का है। अब आप देश को मुसलमानों और गैर-मुसलमानों के नाम पर,अल्पसंख्यकों और बहुसंख्यकों के नाम पर बाँटना चाहते हैं … देश के संसाधनों पर पहला हक़ मुसलमानों का है।” 

व्हिडिओद्वारे असा दावा केला जात आहे की, ‘उत्तर प्रदेशातील पराभवानंतर योगी आदित्यनाथ यांचे सुर बदलले.’ 

या सोशल मीडिया पोस्ट्सचे अर्काईव्ह येथे आणि येथे पाहता येतील.

लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून 2024 रोजी जाहीर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने 240 जागा मिळवून NDA आघाडीच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन केले असले तरी, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी एकट्या पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही.

यावेळी भाजपला उत्तर प्रदेशात सर्वात मोठा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 80 जागांपैकी समाजवादी पक्षाने 36 जागा जिंकल्या असून भाजपच्या खात्यात फक्त 33 जागा गेल्या आहेत, तर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यूपीमध्ये 64 जागा जिंकल्या होत्या.

Yogi Aditynath

काय आहे सत्य?

दाव्याची पडताळणी करण्यासाठी, न्यूजचेकरने प्रथम व्हिडिओच्या मुख्य फ्रेमचा रिव्हर्स इमेज सर्च केला. यादरम्यान, त्यांनी 23 एप्रिल 2024 च्या YouTube पोस्ट मध्ये हा व्हायरल व्हिडिओ पाहिला. यावरून हा व्हिडिओ लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले.

भारत एक्सप्रेस नावाच्या YouTube चॅनेलने व्हायरल क्लिपची एक मोठी आवृत्ती शेअर केली आणि व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, ”मनमोहन सिंह ने किसके इशारे पर कहा देश के संसाधनों पर पहला अधिकार मुसलमानों का है‘” व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे.

Yogi Aditynath

आता न्यूजचेकरने Google वर संबंधित कीवर्ड शोधले. याचा परिणाम म्हणून त्यांना 23 एप्रिल 2024 रोजी Aaj Tak ने या व्हिडिओवर प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना मनमोहन सिंग यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे म्हटले होते, असे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

व्हिडिओच्या लाँग व्हर्जनमध्ये योगी आदित्यनाथ म्हणताट की, “इनके समय में जब कांग्रेस का ये परिवार सुपर PM बना हुआ था, मनमोहन सिंह देश के प्रधानमंत्री थे उन्होंने किसके इशारे पर कहा था कि देश के संसाधनों पर पहला अधिकार मुसलमानों का है…आप देश को मुसलमान और गैर मुसलमान के नाम पर, अल्पसंख्यक और बहुसंख्यक के नाम पर बांटना चाहते हैं?… देश को प्रधानमंत्री मोदी का धन्यवाद करना चाहिए जिनकी वजह से पिछले 10 साल में 25 करोड़ लोग गरीबी रेखा से उभरे हैं।” 

दरम्यान हा व्हिडिओ बनावट दाव्यांसह एडिट आणि शेअर केला जात आहे.

23 एप्रिल 2024 रोजी एएनआयने या व्हिडीओसह माहितीही दिली होती की, योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले होते की, “कोणाच्या सांगण्यावरून मनमोहन सिंग यांनी देशाचे पंतप्रधान असताना देशाच्या संसाधनांवर मुस्लिमांचा पहिला अधिकार असल्याचे सांगितले होते.”

योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधत दिलेल्या या विधानावर हिंदुस्थानने 23 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील मनमोहन सिंग यांच्या जुन्या विधानावरून राजकारण कसे सुरू झाले हे सांगितले आहे.

मंगळवारी, 23 एप्रिल रोजी गोरखपूरमध्ये, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर हिंदू-मुस्लिम, अल्पसंख्याक-बहुसंख्य या नावावर देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या 18 वर्षे जुन्या विधानावरून काँग्रेसविरोधात आघाडी उघडली होती, ज्यावरून राजकारण सुरू झाले होते, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर न्यूजचेकरने एप्रिल 2024 मध्ये लिहिलेला लेख येथे वाचता येईल.

निष्कर्ष

न्यूजचेकरने केलेल्या तपासातून असे समोर आले आहे की, योगी आदित्यनाथ यांचा एडिटेड व्हिडिओ खोट्या दाव्यांसह व्हायरल होत आहे.

'Newschecker' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT