Created By: Boom
Translated By: Sakal Digital Team
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक घराच्या अंगणात एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दलित समाजाच्या लोकांच्या भाजपला मत न दिल्याने घरात घुसून मारहाण केल्याचा दावा सोशल मीडिया युजर्स करत आहेत.
दरम्यान बूम या संकेतस्थळाने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आले की, व्हायरल झालेला व्हिडिओ प्रतापगढच्या माणिकपूरमध्ये झाडे तोडण्यावरून दोन शेजाऱ्यांमधील वादाचा आहे. याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.
उल्लेखनीय आहे की, कौशांबी लोकसभा जागेसाठी पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी मतदान झाले होते, तर प्रतापगड लोकसभा जागेसाठी मतदान 25 मे 2024 रोजी सहाव्या टप्प्यात होणार आहे.
टीव्ही न्यूज चॅनल भारत समाचारने आपल्या एक्स अकाउंटवर शेअर करत लिहिले आहे की, 'कौशांबी - दलित समाजातील लोकांवर हल्ला, भाजपला मतदान न केल्याने मारहाण, भाजप कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केली, मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, सपा उमेदवाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार, कौशांबीच्या माणिकपूरच्या मिरगढवातील प्रकरण.
'एक्स'वरील (X) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.
उत्तर प्रदेश काँग्रेसनेही त्यांच्या एक्स हँडलवरून व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, 'कौशांबीच्या माणिकपूर मीरगढवामध्ये भाजपला मतदान न केल्याने संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दलित समाजाच्या लोकांना बेदम मारहाण केली.'
'एक्स'वरील (X) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.
बूमने व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी या प्रकरणाची अधिक माहिती घेतली. तेव्हा समोर आले की, भारत समाचारच्या व्हिडिओ पोस्टला प्रतापगड पोलिसांच्या एक्स हँडलने उत्तर देताना सांगितले की हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.
प्रतापगड पोलिसांच्या पोस्टमध्ये 20 मे 2024 रोजी प्रतापगड जिल्ह्यातील माणिकपूर पोलिस स्टेशन हद्दीतील राम्मा का पूर्वा गावात ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. झाडाची फांदी विजेच्या खांबावर पडल्याने व विद्युत तार तुटल्याने दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे हे प्रकरण आहे.
घटनेच्या अधिक माहितीसाठी BOOM ने स्थानिक रिपोर्टर सुनील यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बूमला सांगितले की, झाडे तोडण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादामुळे ही घटना 18 मे 2024 रोजी घडली.
या घटनेबाबत, बूमला हिंदुस्तान लाइव्हवर एक बातमी देखील मिळाली, ज्यात इन्स्पेक्टर जयचंद भारती यांनी सांगितले होते की, "हे प्रकरण 18 मे रोजी झाड कापताना विद्युत खांब तुटल्यामुळे झालेल्या वादाशी संबंधित आहे.
वरील सर्व पुरावे पाहाता उत्तर प्रदेशच्या कौशंबीमध्ये भाजपला मतदान न केल्यामुळे दलितांना मारहाण केल्याचा दावा खोटा आहे.
'बूम' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.