Lok Sabha Election Dates 
व्हायरल-सत्य

Lok Sabha Election Dates : निवडणुकीच्या तारखांबाबत व्हॉट्सॲपवर मेसेज व्हायरल... निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Election Dates Fake Message: आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. भारतीय निवडणुक आयोग लवकरच या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे

रोहित कणसे

Lok Sabha Election Dates Fake Message: आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. भारतीय निवडणुक आयोग लवकरच या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. यादरम्यान निवडणूकांच्या तारखांबद्दल काही फेक संदेश व्हायरल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी २०२४ च्या लोकसभा निवडणूकांच्या तारखांबद्दल WhatsApp वर फॉरवर्ड होत असलेल्या मेसोजबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

सोशलम मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये, भारतीय निवडणूक आयोगाने लिहिले की, '#LokSabhaElections2024 च्या वेळापत्रकाबाबत WhatsApp वर एक बनावट संदेश शेअर केला जात आहे. FactCheck: संदेश #Fake आहे. #ECI ने अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. निवडणूक कार्यक्रम आयोगाकडून पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केला जातो.#VerifyBeforeYouAmplify

यापूर्वी शुक्रवारी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत निवडणूक आयोग १३-१४ मार्च रोजी आगामी लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करू शकतो. आयोगाच्या पथकांनी आतापर्यंत अनेक राज्यांना भेटी दिल्या आहेत आणि तेथील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या असल्याचे सांगण्यात आले. निवडणूक आयोग येत्या आठवड्यात उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरला भेट देणार आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग ११-१२ मार्च रोजी निवडणूक तयारी आणि तेथील सुरक्षा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी जम्मू-काश्मीरला भेट देईल. परिस्थितीचा थेट आढावा घेण्यासाठी आणि आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासाठी विविध राज्यांना भेट देण्याच्या निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकात जम्मू आणि काश्मीर शेवटचे आहे. अशा परिस्थितीत आयोगाचे पथक जम्मू-काश्मीरमधून परतल्यानंतर लगेचच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT