mamata banerjee Social Media
व्हायरल-सत्य

Fact Check: ममता बॅनर्जी यांचं खरं नाव मुमताज खातून नाही! व्हायरल होत असलेला दावा खोटा

Fact Check: टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते रिजू दत्ता यांनी बूमला सांगितले की, "त्यांचे शाळेचे प्रमाणपत्र, महाविद्यालयीन प्रमाणपत्र सर्वांवर नाव एकच आहे. ममता बॅनर्जी या ब्राह्मण आहेत आणि त्यांचे गोत्र शांडिल्य आहे."

सकाळ वृत्तसेवा

Created By: Boom

Translated By : सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी संबंधित एक पेपर क्लिपिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पेपर क्लिपमध्ये त्यांचे खरे नाव मुमताज मसामा खातून असल्याचा दावा केला जात आहे. त्या मुस्लिम धर्माच्या आहेत.

बूमने केलेल्या तपासणीत (Fact Check) हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे. टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते रिजू दत्ता यांनी बूमला सांगितले की, "त्यांचे शाळेचे प्रमाणपत्र, महाविद्यालयीन प्रमाणपत्र सर्वांवरती नाव एकच आहे. ममता बॅनर्जी या ब्राह्मण आहेत आणि त्यांचे गोत्र शांडिल्य आहे."

काय आहे दावा?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ही क्लिप फेसबुकवर शेअर करताना एका यूजरने लिहिले की, 'ममता बॅनर्जी यांचे खरे नाव क्वचितच कोणाला माहीत असेल.'

पोस्टची संग्रहण लिंक.

याशिवाय, बूमला ही पेपर क्लिपिंग BOOM च्या टिपलाइनवर मिळाली.

तथ्य तपासणी(Fact Check)

व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी, बूमने निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून 2021 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत काढली.

त्यामध्ये त्यांचे नाव ममता बॅनर्जी असे स्पष्टपणे दिसत असल्याचे बूमला आढळले. त्याच्याशी संबंधित अधिक माहिती या प्रतिज्ञापत्रात पाहता येईल.

सर्वोच्च न्यायालयाने 2022 मध्ये दिलेल्या एका निर्णयात उमेदवाराने शपथपत्रात चुकीची माहिती दिल्यास निवडणूक रद्द केली जाऊ शकते, असे म्हटले होते. उमेदवारांनी स्वतःच्या, जोडीदाराच्या किंवा अवलंबितांच्या मालमत्तेबाबत खोटी घोषणा करणे हे भ्रष्ट आचरण आहे.

याशिवाय ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात वेळोवेळी आपल्या हिंदू अस्मितेबद्दल बोलत असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये बूमला आढळलं. २०२१ च्या इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये त्या बंगालीमध्ये बोलताना म्हणतात, 'मी पण हिंदू कुटुंबातील मुलगी आहे, आमच्यासोबत हिंदू कार्ड खेळू नका.'

रिपोर्ट्सनुसार, ममता बॅनर्जी यांचा जन्म कोलकाता येथील एका बंगाली हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. यावरून त्या मुस्लिम असल्याचा व्हायरल दावा किंवा त्यांचे खरे नाव मुमताज मसामा खातून असल्याचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निष्कर्ष

बूमने पुढील सत्य तपासणीसाठी टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते रिजू दत्ता यांच्याशीही संपर्क साधला. "हा खोटा दावा आहे. त्यांचे शाळेचे प्रमाणपत्र, त्यांचे महाविद्यालयीन प्रमाणपत्र या सर्वांवर त्यांचे नाव एकच आहे. ममता बॅनर्जी ब्राह्मण आहेत आणि त्यांचे गोत्र शांडिल्य आहे," असे त्यांनी बूमला सांगितले. ते पुढे म्हणाले, 'त्यांच्या घरात लहानपणापासूनच काली मातेची पूजा केली जाते.'

''बूम'' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT