Rahul Gandhi Social Media
व्हायरल-सत्य

Fact Check : राहुल गांधी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याची बातमी खोटी; चुकीच्या संदर्भाने व्हिडीओ होतोय व्हायरल

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भारतानाचा राहुल गांधी यांचा मूळ व्हिडीओ 'आर्टिफिशील इंटेलिजन्स व्हॉइस क्लोन' ने बदलत चुकीच्या माहितीने व्हायरल

वृत्तसंस्था

Created By: बूम

Translated By : सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर निवडणूक काळात खोटे दावे करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो याचे उदाहरण या बातमीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडीओमुळे अनेक लोक संभ्रमात पडले आहेत. खरोखरच गांधी यांनी राजीनामा दिला आहे असेच अनेकांना वाटत आहे. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या व्हिडिओमध्ये आवाज बदलून मी राजीनामा देत आहे असे दस्तुरखुद्द राहुल गांधी सांगत आहे. त्यामुळे काय खरे आणि काय खोटे असा प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्यांना पडला आहे.

खरे तर हा मूळ व्हिडीओ हा ३ एप्रिल २०२४ चा आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी 'वायनाड' या मतदार संघातून आपला खासदारकीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

लोकसभा २०२४ ची ही निवडणूक देशात सात टप्प्यात होणार असून याचा पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ पासून सुरु होणार आहे. राहुल गांधी हे वायनाड या केरळ राज्यातील मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजप ईकाई कडून के. सुरेंद्रन तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एनी राजा लढणार आहेत.

मात्र बूम या संस्थेने केलेल्या तथ्य तपासणीत हा व्हिडीओ खोटा असल्याचे समोर आले आहे. जाणून घेऊया संपूर्ण विषय काय आहे?

(दावा करण्यात आलेला व्हिडीओ इथे पहा)

दावा काय केलाय?

पोस्ट १

एका युजरने एक्स वर हा व्हिडीओ पोस्ट करत म्हंटले आहे की, "मनोरंजनाच्या या जमान्यात खऱ्याची अपेक्षा करू नका. या व्हिडिओचा पुरेपूर आनंद घ्या. साभार : अर्ध वयोवृद्ध युवा श्री राहुल गांधी"

या व्हायरल व्हिडीओमध्ये राहुल गांधी हे स्वतः म्हणतायेत " मी राहुल गांधी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. माझ्याकडून आता राजकाणासाठी हिंदू बनण्याचे नाटक अधिक होऊ शकत नाहीये. अन्याय यात्रेनंतर मी एक पत्र देखील काढले पण मोदीजी सर्व भष्टाचाऱ्यांना जेलमध्ये पाठवत आहेत. आता मोदींच्या राज्यात सर्व भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये पाठवलं जात आहे, त्यामुळे मी माझ्या आजोबांच्या घरी इटलीला निघून जात आहे. " या व्हिडिओमध्ये राहुल गांधी काही दस्तऐवजावर सही करत त्याचे मोठ्याने वाचन करतानाही दिसत आहे तर पाठीमागून अनेक पत्रकार त्यांचे फोटो घेत आहेत असा तो व्हिडीओ आहे.

पोस्ट २

दुसऱ्या एका युजरने तोच व्हिडीओ शेअर करत फेसबुकवर लिहिले आहे की, " राहुल गांधी काँग्रेसचा राजीनामा देत आहेत का, जर देत असतील तर चांगली गोष्ट आहे, काँग्रेस पक्षाचे भले होईल."

बूम ने केलेल्या तथ्य तपासणीत (Fact Check) मध्ये काय आढळले?

बूम या फॅक्ट चेक करणाऱ्या संस्थेने केलेल्या पाहणीत त्यांना असे आढळून आले की, हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व्हॉइस क्लोन म्हणजेच आवाज बदलण्याचे तंत्र वापरून बनविण्यात आला आहे. खरे तर हा मूळ व्हिडीओ हा ३ एप्रिल २०२४ चा आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी वायनाड या मतदार संघातून आपला खासदारकीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

fact check rahul gandhi

कशी केली Fact Check?

पुरावा १

'बूम' ने केलेल्या पाहणीत या 'व्हायरल व्हिडीओ' च्या फ्रेम तपासल्या त्यावेळी त्यांना 'द हिंदू' या वृत्तपत्राच्या अधिकृत एक्स हँडलवर ३ एप्रिल २०२४ चा मूळ व्हिडीओ मिळाला. ज्यामध्ये राहुल गांधी वायनाड मधून खासदारकीचा अर्ज भरत आहेत असे सांगण्यात आले आहे.

पुरावा २

बूम ने याबाबत आणखी 'की वर्ड' चेक केले असता त्यांना काँग्रेस पक्षाच्या अधिकृत यू ट्यूब चॅनेलवर राहुल गांधी खासदारकीचा अर्ज भरत असलेला व्हिडीओ मिळाला. ज्यामध्ये राहुल गांधी वायनड मधून अर्ज भरत असताना वाचून दाखवत आहेत की, " मी राहुल गांधी. लोकसभेच्या एका जागेसाठी उमेदवार म्हणून मला नामांकित केले गेले आहे. मी गांभीर्याने कायद्याद्वारे स्थापित संविधानाप्रती आस्था आणि निष्ठा ठेऊन देशाचे अखंडत्व राखण्यासाठी प्रयत्न करेन. "

निष्कर्ष

या मूळ व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठेही काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.

बूम ने 'आयआयटी जोधपूर' आणि 'डिजिटायडी' च्या साहाय्याने बनविलेल्या 'इतिसार' या डीपफेक विश्लेषण टूलच्या माध्यमातून या व्हिडिओची तपासणी केली असता या व्हायरल व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेली 'ऑडिओ क्लिप' खोटी असल्याचे आढळून आले आहे.

'बूम' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT