shah rukh khan official statement after Subramanian Swamy claim over qatar frees 8 ex indian navy officers on death row  
व्हायरल-सत्य

Shah Rukh Khan on Qatar : शाहरुख खानमुळे सुटले ८ नौदल अधिकारी? भाजप नेत्याचा दावा! जाणून घ्या सत्य

Shahrukh Khan : काही दिवसांपूर्वी कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेले आठ भारतीय नौदलातील अधिकारी सुखरुप भारतात परत आले, याचे श्रेय भाजप नेत्याने बॉलिवुड स्टार शाहरुख खान याला दिलं...

रोहित कणसे

Shah Rukh Khan Latest News : काही दिवसांपूर्वी कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेले आठ भारतीय नौदलातील अधिकारी सुखरुप भारतात परत आले. दरम्यान यापूर्वी त्यांची शिक्षा कमी करण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. (shah rukh khan official statement over qatar frees 8 ex indian navy officers)

शाहरुख खान काही दिवसांपूर्वी कतार मधील दोहा येथे होता. तो स्पेशल गेस्ट ऑन ऑनर म्हणून एएफसी फायनलमध्ये भाग घेण्यासाठी गेला होता. या भेटीदरम्यान त्याने कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसीम अल थानी यांची भेट देखील घेतली. किंग खान आणि पंतप्रधान यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

यादरम्यान भाजपचे नेते सुब्रम्हण्यन स्वामी यांनी मात्र नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेचे श्रेय मोदी सरकारला न देता बॉलीवुड अभिनेता शाहरूख खान याला दिल्याने एकच खळबळ उडाली.

सुब्रम्हण्यन स्वामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोदींनी आपल्या सोबत चित्रपट स्टार शाहरुख खान याला कतारला न्यावे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय (एमईए) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लाकार (एनएसए) हे कतारच्या शेखांचे मन वळवण्यात अयशस्वी ठरल्यानंतर शाहरूख खानला विनंती केली की त्यांनी हस्तक्षेप करावा. अशा प्रकारे आपल्या माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी कतारच्या शेखांसोबत एक अत्यंत महागडी डील पूर्ण झाली.

अखेर सत्य काय आहे?

दरम्यान या दाव्यानंतर अभिनेता शाहरुख खानच्या टीमने भाजपच्या माजी नेत्याचे दावे फेटाळत एक निवेदन जारी केले आहे. कतारमधून भारताच्या नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेमध्ये शाहरुख खानच्या कथित भूमिकेबद्दलच्या रिपेर्टबद्दल, शाहरुख खानच्या कार्यालयाचे म्हणणे आहे की त्याच्या सहभागाचे असे कोणतेही दावे निराधार आहेत. हे काम फक्त भारत सरकारच्या अथक प्रयत्नानंतर पूर्ण होऊ शकलं आहे. यामध्ये मिस्टर खान यांचा कुठलाही सहभाग नाही. शाहरुख खानच्या व्यवस्थापक पूजा ददलनी यांनी इंस्टाग्रामवर यासंबंधीचे निवेदन शेअर केले आहे.

पूजा ददलानी यांनी पुढे लिहीलं की, आम्ही हे देखील स्पष्ट करतो की डिप्लोमसी आणि स्टेटक्राफ्ट संबंधी प्रकरण आपल्या नेत्यांनी अत्यंत चागल्या प्रकारे पूर्ण केलं. मिस्टर खान अन्य भारतीय नागरिकांप्रमाणे मिस्टर खान यांनी देखील भारतीय नौदलाचे अधिकारी सुरक्षित घरी परतल्याबद्दल आनंदी आहेत आणि त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT