Ashadhi Ekadashi How is the first Varkari selected for Vitthala Puja  
वारी

Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचा पहिला वारकरी कसा निवडला जातो?

सकाळ डिजिटल टीम

आषाढी एकादशी हिंदू धर्मांमध्ये सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते. वारकरी, विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. गेल्या 15 दिवसांपासून पायी वारी करून आलेल्या, दमलेल्या थकलेल्या डोळ्यांना आता विठूदर्शनाची आस लागलेली आहे.

महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार, आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडते. यावेळी एका वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळतो. पण कोणत्या वारकऱ्याला मान द्यायचा हे कसं ठरतं? आणि कोण ठरवतं? जाणून घेऊयात.(Ashadhi Ekadashi How is the first Varkari selected for Vitthala Puja)

हे मानाचे वारकरी कोण आणि कसं ठरवतात?

मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पुर्णपणे मंदिर समितीला आहे. शासकिय पुजेचा प्रकार हा समिती अस्तित्वात आल्यानंतर आला. १९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा केली जाते तर त्यांच्यासोबत मानाचे वारकरी पुजेस उपस्थित असतात. आणि ते निवडण्याचा अधिकार मंदिर समितीकडे देण्यात आला आहे.

विठ्ठलाची पुजा हि पहाटे पार पडते. मुख्यमंत्री मंदिरात उपस्थित राहिले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पुजेची तयारी चालू होते. अशा वेळी दर्शनरांगेत पुढे उपस्थित असणाऱ्या दांपत्याला हा मान दिला जातो. जे दांपत्य दर्शनरांगेत समोर असेल त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर पुजा करण्यासाठी बोलावलं जातं. त्यानंतर त्या दांपत्याचा मंदिर समितीमार्फत सत्कार देखील केला जातो.

आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल. राज्यातल्या विविध भागांसह कर्नाटक आणि तेलंगणामधूनही लाखो भाविकांचं पंढरीमध्ये आगमन झालं आहे. यंदाच्या एकादशीला लाडक्या विठुराया आणि रुक्मिणीसाठी बेंगलोर येथून खास पोषाख बनवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT