Ashadhi Wari 2023 history of pandharpur wari sant tukaram maharaj sant dnyaneshwar maharaj palkhi sakal
वारी

Ashadhi Wari: 'वारी'ला निघालात? पण 'वारी' कधी आणि कशी सुरू झाली हे माहितीये का?

महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे पंढरीच्या वारीला आता सुरुवात झाली आहे.

नीलेश अडसूळ

Ashadhi wari 2023 : पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.

हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो.

आयुष्यात एकदा तरी आपण वारी करावी असं प्रत्येकाला वाटत असतं, पण वारी नेमकी का करावी, कशी करावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

(Ashadhi Wari 2023 history of pandharpur wari sant tukaram maharaj sant dnyaneshwar maharaj palkhi)

प्रस्थान सोहळे पार पाडत 'ग्यानबा तुकाराम' गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहेआणि ती पुढेही राहील.

पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. हाच हरिमय इतिहास, वारीची दिव्य परांपरा आज आपण अगदी सोप्या आणि सध्या शब्दात उलगडणार आहोत.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोर म्हणतात, 'महाराष्ट्रात असंख्य प्रथा आहेत पण ही 'पंढरीची वारी' म्हणजे प्रथा नाही तर आपल्या विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे. जी अखंड आणि अभंग सुरू आहे.'

ते म्हणतात ' वारी म्हणजे काय तर पंढरीची वारी, अर्थात ती विठ्ठलाची. आता या विठ्ठलाचे जे उपासक आहेत ते सगळे वारकरी. आता हे वारकरी आपल्या देवाची जी उपासना करतात, त्याच्या भेटीला जातात, म्हणून ती वारी. आणि हा सर्व संप्रदर एकत्र मिळून ती वारी करतो म्हणून त्याला व्यापक स्वरूप आलं आहे.'

'आता ही वारी कधी सुरू झाली तर, ज्या दिवशी विठ्ठल पंढरपूरात तेव्हापासून ही वारी सुरू झाली. कारण 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा..' म्हणजे युगानयुगे हे सुरू आहे, ज्याचा काळ निश्चित नाही.'

'पण ऐतिहासिक संदर्भ पहायला गेलं तर 13 व्या शतका पासून वारीचे संदर्भ, पुरावे आपल्या आढळून येतात, आणि त्यामध्ये ही वारी त्याहीपेक्षा प्राचीन असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे हजारो वर्षांची ही परंपरा आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही,''असं सदानंद मोरे म्हणतात.

त्यांच्यामते, 'ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम अशा सकल संतांनी वारी केली आहे. त्यामुळे ही परंपरा कित्येकवर्षे चालत आली आहे. आणि ती अखंडित आहे कारण ही सामूहिक उपासना पद्धती आहे, याच सामूहिक एकात्मतेच्या भावनेतून ही वारी सुरू झालेली आहे. ज्यात एकी आहे, त्यात भाईचारा आहे, त्यात आनंद आहे, भक्ती आहे, प्रेम आहे आणि विशेष म्हणजे पांडुरंगाला भेटायची आस आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT