Ashadhi Wari 2024 sant tukaram and sant dnyaneshwar maharaj palkhi sohala history and importance 
वारी

Ashadhi Wari : तुकाराम पालखी अन् ज्ञानेश्वर पालखी अशा दोन वेगळ्या पालख्यांच्या आयोजनामागचा इतिहास माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 28 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे. त्यामुळे देहूमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात पंढरीची वारी म्हणजे एक मोठा सणच मानला जातो. आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता पायदळी तुडवत पांडुरंगाच्या भेटीला जातात.

पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे. या वारीमध्ये पालखी सोहळ्याला महत्त्व आहे. तर आज आपण जाणून घेऊयात, वारी म्हणजे काय? पालखी सोहळा कोणी सुरु केला? अन् वारीदरम्यान तुकाराम पालखी आणि ज्ञानेश्वर पालखी अशा दोन पालख्यांचे आयोजन का?

वारी म्हणजे काय?

वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे.

ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यांत पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली असं सांगण्यात येत. वारी करण्याची परंपरा साधारणतः 800 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.

तुकाराम पालखी आणि ज्ञानेश्वर पालखी अशा दोन पालख्यांचे आयोजन का?

मिळालेल्या माहितीनुसार, इ. स १६८५ मध्ये तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी - वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे ठरविले.

संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले, तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इ. स १८३० पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम कुटुंबात वाद होत होते.

या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर पालखी आणि देहूहून तुकाराम पालखी अशा वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.

पालखी सोहळा म्हणजे काय?

पालखी ही १००० वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे. ज्याचे पालन करणारे वारकरी, लोक वारी नावाच्या प्रथेचे पालन करतात. दिंड्यांमध्ये वारकऱ्यांचा समूह एकत्र येऊन, गाणे, नृत्य आणि ज्ञानबा-तुकारामाचा जयघोष करून लोक हा उत्सव साजरा करतात.

पंढरपूरला वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वर्षातून एकदा जातात आणि पंढरपूरला वारीतून जाण्यासाठी चार तीर्थ यात्रा असतात. वारकरी वर्षातील चैत्र वारी / यात्रा, कार्तिकी वारी / यात्रा, आषाढी वारी / यात्रा, माघी यात्रा या पैकी कोणत्याही एका वारीतून पंढरपूरला जातात. पण आषाढी वारी मोठ्याने साजरी करण्यात येते.

आषाढी वारीला इतकं महत्त्व का?

असं सांगण्यात येते की, या आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते तसेच दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो. या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात. आषाढी एकादशी काळात मंदिर दिवसाचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT