Obesity sakal
वुमेन्स-कॉर्नर

आरोग्यसखी : किशोरवयीन मुलांमधील स्थूलता

‘किशोरवयीन मुलांमधील लठ्ठपणा’ ही सध्याची एक गंभीर समस्या आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘किशोरवयीन मुलांमधील लठ्ठपणा’ ही सध्याची एक गंभीर समस्या आहे.

- अपर्णा दीक्षित, मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक

गाडी सिग्नलला नेहमीपेक्षा जास्त थांबली. ‘का बरं?’ असं जरा वाकून बघितलं तर लक्षात आलं, की एका शाळेची मुलं आणि त्यांचे शिक्षक, शिक्षिका रस्ता ओलांडत आहेत म्हणून गाड्यांना थांबवलं आहे. कोरोनाची साथ, लॉकडाऊन, ऑनलाइन शाळा यांत दोन वर्षे गेल्यावर हे असं दृश्य बघायला फारच छान वाटत होतं. मी निवांत गाडी बंद करून त्यांना बघत बसले. मुलं पण आनंदात चालली होती, मास्क सांभाळत आपापसात गप्पा मारत होती. थोड्याच वेळात माझ्या नजरेनं ओव्हरवेट, जास्त वजन असणाऱ्या मुलांना टिपायला सुरुवात केली. बॉडी शेमिंग योग्य नाही आणि आकार, वजन यांवरून भेदभाव करणं अयोग्य आहेच शंभर टक्के; पण तरीही समोर चालणाऱ्या मुलांमध्ये जी वजनदार मुलांची संख्या होती ती बघून मी जरा अस्वस्थ झाले हे मी नाकारूच शकत नाही.

‘किशोरवयीन मुलांमधील लठ्ठपणा’ ही सध्याची एक गंभीर समस्या आहे. कोरोना कृपेने मैदानी खेळ बंद, ऑनलाईन शाळा, स्क्रीनचा अतिवापर आणि घरीच असल्यामुळे वारंवार आणि जंक फूड सेवन या सगळ्यांचा एकत्रित परिणाम मुलांच्या शरीरावर दिसत आहे.

मुलांमध्ये वजन समस्या दिसण्याची काही प्रमुख कारणं

  • हार्मोन असंतुलन : मुलींमध्ये PCOS मुळे मासिक पाळी अनियमित होणं, वजन वाढणं या समस्या दिसतात

  • आनुवंशिकता : आई/ वडील जाड असल्यामुळे मुलांमध्ये लवकर वजन वाढण्याची प्रवृत्ती असू शकते

  • चुकीची जीवनशैली : बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जंक फूडमुळे होणारे कुपोषण

  • ताण : घरात आर्थिक ताण, आजारी व्यक्ती किंवा आई वडिलांच्या नात्यामधला ताण असेल तर मुलं भावनिक खाणे अर्थात emotional eating करून ह्या ताणाचा सामना करतात.

वजनाची समस्या इतर काही शारीरिक आणि मानसिक समस्यांना जन्म देते :

  • मधुमेह आणि हृदयरोग यांची शक्यता बळावते

  • सांधेदुखी

  • अतिझोप, उत्साह न वाटणे, आळस

  • मुलांचा आत्मविश्वास कमी होणे

  • आपण छान दिसत नाही असं वाटून बाकीच्या मुलांपासून लांब, एकटं राहणं

  • निराशा, चिंता असे मानसिक आजार

  • जाडी या विषयावरून बाकीच्या मुलांकडून चिडवलं जाणं आणि त्यामुळे ग्रुपमध्ये आपण सामावत नाही अशी निराशाजनक भावना येणं.

  • एकाग्रता कमी होऊन मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो.

मुलांचा वाढत्या वजनाची समस्या आणि त्यामुळे ढळलेले मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी आपण काय करू शकतो?

  • रोज एक तास मैदानी खेळ, व्यायाम, नृत्य, पोहणं, सायकलिंग अशा हालचाल करायला लावणाऱ्या क्रियांना देणं. दहावी- बारावीचं वर्ष आहे म्हणून बरेचदा मुलांचे खेळ, नृत्याचे क्लास, पोहणं, सायकल चालवणं बंद केलं जातं आणि नंतर ही दरी वाढतच जाते. कितीही अभ्यास असला, तरी खेळ, व्यायाम याला एक तास नक्कीच काढता येतो. मुलांची उंची वाढण्याचा हा महत्त्वाचा काळ असतो- त्यामुळे व्यायाम थांबवू नये. मुख्य म्हणजे एकाग्रतेनं अभ्यास करण्यास व्यायाम प्रेरणाच देतो. नृत्य, खेळ यांमुळे वाढलेला आत्मविश्वास मुलं आपसूकच अभ्यासात वापरतात. खंड पडू न देता चालू ठेवलेले खेळ, व्यायाम हे मुलांना पुढे मोठे झाल्यावर ‘निरोगी जीवनशैली’ चालू ठेवायला मदत करतात.

  • वाईट/ नकोशा सवयी काढायच्या असतील, तर तो वेळ आणि ती शक्ती लगेच चांगल्या सवयी लावून घ्यायला वापरली पाहिजे. मुलं स्क्रिन, गेम्स, टीव्ही ह्यांचा वेळ काहीतरी सर्जनशील छंद जोपासायला वापरू शकतात. वाद्य, नवीन भाषा, गायन, नृत्य, चित्रकला असे काहीतरी शिकण्यास आपण मुलांना प्रेरणा देऊ शकतो.

  • घरात पॅकेट फूड न आणणं, लिफ्ट न वापरता जिना चढून जाणं, जवळपास जाण्यास सायकल वापरणं असे जीवनशैलीमध्ये बदल फक्त मुलांकडून न अपेक्षता, संपूर्ण कुटुंबानं केल्यास मुलांना आपल्यावर अन्याय केला जातोय असं वाटत नाही.

  • समुपदेशन करून मुलांच्या भावनिक खाण्यावर काम करता येते. त्यांचा स्वाभिमान, स्व-मूल्य (self worth) उंचावण्यासाठी प्रयत्न करता येतो. निराशा, चिंता अशा मानसिक समस्या तर समोपदेशाने नक्कीच हाताळता येतात.

अलोहा क्लिनिकमध्ये मेडिकल जिम आहे- जिथं योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करून घेतला जातो. या सुविधेचा वापर वजन समस्या असणारी मुलं नक्कीच करू शकतात. किशोरवयीन मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेऊन आनंदी, निरोगी आणि मनसोक्त खेळणारी एक पिढी तयार करणं ही आपल्यासारख्या मैदानी खेळ खेळत मोठ्या झालेल्या पालकांची जवाबदारी आहे. मगच हे वाण ते त्यांच्या पुढच्या पिढीला देऊ शकतील, नाही का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT