Aarti Mardikar Sakal
वुमेन्स-कॉर्नर

माझिया माहेरा : माहेरची शिदोरी

‘माहेर’ हा शब्द नुसता उच्चारला, तरी पोटात कालवाकालव सुरू होते. ‘सकाळ’नं आवाहन केले आणि माहेर डोळ्यांसमोर तरळून लागलं.

सकाळ वृत्तसेवा

‘माहेर’ हा शब्द नुसता उच्चारला, तरी पोटात कालवाकालव सुरू होते. ‘सकाळ’नं आवाहन केले आणि माहेर डोळ्यांसमोर तरळून लागलं.

- सौ. आरती मदन मार्डीकर, (माहेरची शोभा देविदास उमरीकर), शिक्रापूर, पुणे

‘माहेर’ हा शब्द नुसता उच्चारला, तरी पोटात कालवाकालव सुरू होते. ‘सकाळ’नं आवाहन केले आणि माहेर डोळ्यांसमोर तरळून लागलं.

आई-वडील व बालपणीचे प्रसंग ठळकपणे डोळ्यसमोर उभे राहिले. वयाच्या ८-९ वर्षांपर्यंतचं फारसे आठवत नाही. वडील आधी सरकारी वकील होते. औरंगाबादला आम्ही लेबर कॉलनीत राहात होतो. समोरच मारुतीचे मंदिर होतं. घर लहान, पण तरीदेखील माझ्या वडिलांनी अनेकांना आधार दिला. आईनं देखील न कुरकुरता साथ दिली. माझी आई मी दहा वर्षांची असतानाच वारली. त्यानंतर दुसरी आई आली. ‘सावत्र’ हा शब्द का वापरतात मला कळत नाही. माझ्या व आईमध्ये सावत्र शब्द कधी आलाच नाही. वडिलांना खूप माणसं जमा करायची सवय. साधारण परिस्थिती, अशातही वडिलांचे मावसभाऊ अनिल पोहोनेरकर, चुलतभाऊ सुधाकर उमरीकर, काका-काकू, मामा, आम्ही भावंडं, एवढी लोक गुण्यागोविंदानं राहत होतो. तेव्हा गॅस किंवा कुकर नव्हता, आई शेगडीवर स्वयंपाक व स्टोव्हवर चहा वगैरे करत असे. आता विचार केला तर वाटतं, ‘एवढ्या माणसांचं आई एकटी कसं करत असेल?’ मी थोडाफार हातभार लावत होते. नंतर वडील न्यायाधीश झाले.

सतत बदल्या होत गेल्या, पण सर्वच ठिकाणी वडिलांनी नाव कमावले, मित्र जोडले. नागपूरला असताना माझं लग्न झालं. नंतर वडिलांची बदली भुसावळला झाली. माहेरची सुखाची झोप मी कधी विसरू शकत नाही. जावयाचा कायम साग्रसंगीत पाहुणचार व्हायचा. बहीण-भावंडं माझ्या मुलांना सांभाळायची. मी मात्र माहेरपण उपभोगायची. वडील निवृत्त झाल्यावर औरंगाबादला स्थायिक झाले. ते माझे खूप लाड करायचे. आईचा एक थोडा उंच स्टूल होता. त्यावर बसून ती स्वयंपाक करायची, तिच्या हाताला खूप चव होती. मंद आचेवर केल्या जाणाऱ्या बेसनाच्या लाडवांची आणि शिऱ्याची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळते. स्वयंपाकाचा तिला कधी कंटाळा आला नाही. वडील गेल्यावरही बरेच दिवस ती एकटीच राहात होती. त्याही वयात सर्व कपडे, भांडे खूप व्यवस्थित ठेवायची.

आज माझे एवढे वय होऊनही माहेरची ओढ कमी झालेली नाही. आई-वडील, बहीण-भावंडं यांच्या आठवणी मनात रुंजी घालतात. घरात मी मोठी असल्यामुळं, भावंडांच्या लहानपणीच्या आठवणी मनाच्या एका कप्प्यात आहेत. वडिलांकडून माणसं जोडण्यास व आईकडून नीटनेटकेपणा हे गुण मी आत्मसात केले. माझी भावंडांनीही त्यांच्या कारकिर्दीत खूप चांगली प्रगती केली. भावांकडं गेल्यावर ते माझी खूप काळजी घेतात. माझ्या माहेरची सर्व मंडळी खूप बोलकी व सर्वांत मिसळणारी आहेत. माहेरच्या या शिदोरीमुळं, लग्न झाल्यानंतर हिंगोलीला अनेक सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करू शकले आणि ‘जीवन गौरव’ पुरस्काराची मानकरी ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT