तीन ते आठ वर्षांदरम्यान नाकातून रक्ताची धार लागणे ही समस्या बऱ्याचदा उद्भवते. याला घोळणा फुटणे असेही बोलीभाषेत म्हटले जाते. ही पालक व घरातील सदस्यांसाठी भीतीदायक असते; यात घाबरून जाण्यासारखे काही नसते. हे हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रक्त कुठून येते?
नाकाच्या शेंड्याच्या भागात नाकाला रक्तपुरवठा करणाऱ्या सर्व रक्तवाहिन्या एकत्र येतात. या भागातील नाकाचे आतील आवरण हे इतर भागांपेक्षा जास्त नाजूक असते. म्हणून नाकाच्या शेंड्याच्या म्हणजे पुढे व समोरच्या भागातून रक्त वाहत असते.
कारणे
उपचार
मुलाला उभे करा, चेहरा पुढे व खाली करून थोडे पुढे वाकून उभे राहायला सांगा. असे केल्यावर आईने वरून चिमटीत पूर्ण नाक बंद करून दाबून ठेवावे व मुलाला तोंड उघडे ठेवून तोंडावाटे मोठे श्वास घेण्यास सांगावे. नाकातून येणारे रक्त काही वेळात अपोआप थांबत असते, त्यामुळे हा उपाय दहा मिनिटांपर्यंत करत राहावा. त्यानंतर चिमटीत पकडलेले नाक सोडून रक्त येते आहे का हे तपासून पाहावे. याने रक्त थांबत नसेल, तर डॉक्टरकडे जावे. डॉक्टर नाकात बँडेजचा रोल टाकतात व रक्त येणारी जागा बंद करतात. नाकाभोवती बर्फ एका कापडात गुंडाळून पकडल्यानेही रक्त थांबू शकते.
नाकातून रक्त येणे टाळण्यासाठी
मुलांमधील नाक टोकरण्याची सवय मोडली पाहिजे. दर वर्षी हिवाळ्यात/ उन्हाळ्यात रक्त येत असेल, तर नाकात अधूनमधून नॉर्मल सलाईनचे ड्रॉप टाकून नाकाच्या आतील भाग ओला राहील हे पाहता येते; पण नाकात तेल/ तूप टाकू नये.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.