Women-led companies outperform men-led companies : कोरोना संक्रमणानंतर युरोपीय देशांमध्ये अशा कंपन्या वेगाने प्रगती करत आहेत, ज्यामध्ये सर्व सुत्रे महिलांच्या हातात आहे. ही माहिती ब्रिटनमध्ये झालेल्या हॉऊस ऑफ कॉमन्स स्टडीमधून( United's House of Commons study) समोर आली आहे. इंटनॅशनल वुमन्स डे एक दिवस आधी हा संशोधन अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार, ज्या कंपन्याचे नेतृत्व महिला सांभळत आहे त्यांची कामगिरी पुरुषांच्या नेतृत्व असलेल्या कंपन्याच्या तुलनेमध्ये कित्येक पटीने चांगली आहे. ( Companies with female leaders outperform those dominated by men, data shows)
हा अहवाल ब्रिटनमधील द गार्डियन वृत्तपत्रामध्ये छापून आला आहे ज्यानुसार, ब्रिटेनमध्ये अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी महिलांकडे केंद्रीय नेतृत्व दिले पाहिजे. कारण दाव्याचा ठोस पुरावा आहे की, ज्या संस्थामध्ये महिलांकडे नेतृत्व आहे त्यांचा विकास कोरोना महामारीनंतर जास्त दिसत आहे. या रिपोर्टमध्ये महामारीच्या काळात महिलांच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांना वसुली योजनांदरम्यान बाजूला केले गेले.
या अभ्यासानुसार, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीच्या नेत्यांनुसार अॅनेलिस डोड्स (Anneliese Dodds) यांच्या म्हणणे आहे की, ब्रिटनमध्ये कोरोना महामारीनंतर इकोनॉमिक रिफॉर्म्स म्हणजे आर्थिक सुधारणांमध्ये महिलांना केंद्रीय भूमिका पार पाडली पाहिजे. या अहवालानुसार, महिलांकडे एक मजबूत अर्थव्यवस्थामध्ये बनविण्याची किल्ली आहे पण गुंतवणूकीच्या कमतरतेमुळे आणि देशातील काही भागात चाईल्ड केअर डेजटर्समुळे त्यांना संधी दिली जात नाही. पण सध्याचे सरकार महिलांच्या समस्या हाताळत आहे. '
कार्यकारी टीममध्ये लैंगिक वैविध्य असल्यामुळे टॉप कंपन्यांना २५ टक्के जास्त फायदा होण्याची शक्यता निर्माण होत आहे. पण ३० टक्क्यांपेक्षा जास्त महिला अधिकारी असलेल्या कंपन्या जास्त चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
महिलांचे नेतृत्व असलेल्या एसएमई (Small and Medium Enterprise) आर्थिक उत्पादनामध्ये साधारण 8.59 लाख कोटी रुपयांचे योगदान देऊ शकते. पण ब्रिटनच्या डिपार्टमेंट ऑफ बीईआयएस (Business, Energy and Industrial Strategy) संशोधनानुसार, केवळ १६ टक्के स्मॉल एंटरप्राईज एम्प्लॉयर (small enterprise employer) आणि ३ पैकी एक महिला उद्योजक आहे. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांना कमी कर्ज मिळते. केवळ १५ टक्के बँकेमध्ये महिलांद्वारे कर्जसाठी अर्ज केले आहेत. तेच २२ टक्के महिला नवीन बिझनेससाठी बँकेमध्ये अकाऊंट सुरु करतात. महिलांना समानता देण्यासाठी साधारण १ लाख स्टार्टअप नव्या कल्पनेच्या आधारावर सुरु केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.