डिवोर्स झाल्याने किंवा पार्टनर वारल्याने मुलांचे संगोपन एकट्याने करणाऱया सिंगल मदर्सना पार्टनरची गरज वाटू लागल्याने त्या Dating app ला पसंती देत आहेत.
देशभरातील ५००० तरुण स्त्री-पुरुषांच्या एका सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे की मिलेनियल (मध्यमवयीन: २४ ते ४० वयातील) आणि जनरेशन झेड (१८ ते २४ वयोगट)या दोन्ही वयातील तरुणाईच्या ५०% भारतीय मातांनी बदल स्विकारत डेटिंग अॅप्सवर स्वतःसाठीचा जोडीदार शोधायच्या आपल्या मुलांच्या प्रयत्नांना आपलेसे केले आहे.
भारतात डेटिंग या संकल्पनेबद्दल सध्याच्या काळात असलेले समज-गैरसमज शोधून काढण्यासाठी ट्रूली मॅडली तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून आणखी एक बाब पुढे आली ती म्हणजे ८० टक्के मुंबईतील मातांनी आपल्या मुलांनी प्रेमविवाह करायला पाठिंबा दर्शविला आहे.
सुरक्षा, वय आणि समाज या तीन गोष्टीभोवतीच आया विवाहाची चर्चा करत असतात- ‘आम्ही काय आज आहोत, उद्या नसू,’ (आता आम्ही तुमची काळजी घेत आहोत. आमच्यानंतर तुमची काळजी कोण घेणार?) ‘नंतर कोणी मिळणार नाही’ आणि ‘लोकं काय म्हणतील’ असे मुख्य प्रश्न असतात.
· सध्याच्या काळानुसार मातांनी नवीन बदल स्वीकारलेले असले तरी २२ टक्के प्रतिसादकांनी डेटिंग अॅप्सबद्दल चर्चा करायला विरोध दर्शविला. याला अनुमोदन मिळेल का याविषयी तरुणाईच्या मनात असणारी भीती यातून सूचित होते.
ट्रूली मॅडलीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहिल खानोर म्हणाले, “डेटिंग संकल्पनेबद्दल भारतात पूर्वग्रह, गैरसमजुती, भीती आहे का हे समजून घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. पण केवळ तरुणाईच नाही तर त्यांच्या पालकांनीही बदलाचे वारे स्वीकारले असल्याचे पाहून, मानसिकतेत झालेला संपूर्ण बदल पाहून थक्क झालो. विवाहविषयक निर्णय प्रक्रियेत आयांची भूमिका लक्षात घेता जी तरुण पिढी विवाह संस्थेविषयी वंचित भूमिका घेताना दिसायची ते आता आगामी वर्षात या गोष्टीकडे सक्रीयपणे बघायला लागतील, असेही खानोर म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.