रक्तातून शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करणारा हिमोग्लोबिन हा मुख्य घटक असतो. हा टेस्टद्वारा सहज मोजता येणारा घटक आहे. शरीरात हिमोग्लोबिन कमी असण्याला अॅनिमिया/ रक्तल्पता/ पंडुरोग असे म्हणतात.
अॅनिमियाची व्याख्या काय?
हिमोग्लोबिन पुढील व्हॅल्यूच्या खाली आढळल्यास अॅनिमिया असल्याचा निष्कर्ष काढला जातो :
६ महिने ते ५ वर्ष : ११
६ ते १४ वर्ष : १२
१४ वर्षाच्या पुढे : १३ (मुलगा), १२ (मुलगी)
आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अॅनिमियाची कारणे :
- हिमोग्लोबिन व लाल पेशी नीट बनू न शकल्याने.
- आहार नीट नसल्याने शरीरात लोह (आयर्न), बी १२ व फोलिक अॅसिडची कमतरता, हे सर्वाधिक आढळून येणारे कारण आहे.
- जन्मजात व अनुवंशिकतेने येणारे रक्ताचे आजार – थॅलेसेमिया, अप्लास्टिक अॅनिमिया, सिकल सेल अॅनिमिया.
- काही आजारांमुळे रक्ताचा क्षय होणे – जंत , मलेरिया, रक्ताविरोधात पेशी तयार होऊन रक्ताचा क्षय होणे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लक्षणे :
सुरुवात होते, तेव्हा अॅनिमियाची अशी विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत; पण वाढत गेल्यावर लक्षणे दिसून येतात. बाळाला अॅनिमिया आहे, की नाही हे तपासण्याचे सगळ्यात चांगले घरगुती परीक्षण म्हणजे बाळाचा तळहात तपासणे. तो लालसर किंवा गुलाबी असायला हवा. जर तो फिका किंवा पांढरा दिसत असेल, तर अॅनिमिया आहे असे समजावे.
अॅनिमियाची इतर लक्षणे म्हणजे :
- वाढ नीट न होणे.
- बाळ चिडचिडे किंवा उदास राहणे.
- अभ्यासात मागे असणे.
- रात्री झोप शांत न लागणे.
- माती खाणे.
- रडताना श्वास रोखून धरणे.
- वारंवार सर्दी खोकला व इतर संसर्ग होणे.
- नखे , जीभ, चेहरा पांढरा वाटणे.
- बी १२ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया असल्यास नखांखाली काळे होणे.
अॅनिमिया दीर्घकाळ उपचाराशिवाय राहिल्यास मुलाच्या बुद्ध्यांकात ५ ते ७ अंकांनी घट होऊ शकते व पुढील शैक्षणिक कारकिर्दीवर दुष्परिणाम होऊ शकतो.
लोहाच्या (आयर्न) कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया :
हा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा व उपचारासाठीही सगळ्यांत सोपा असलेला अॅनिमिया आहे. सहा महिन्यांनंतर योग्य व सकस आहार सुरू न करता फक्त स्तनपानच सुरू ठेवल्यास हा पहिल्या वर्षातच सुरू होऊ शकतो.
प्रतिबंध :
- सहा महिन्यांनंतर वरचे अन्न सुरू करणे.
- जन्माच्या वेळी अडीच किलोपेक्षा कमी वजनाच्या मुलांना दोन महिन्यांपासून लोहाचे औषध बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने सुरू करणे.
- आहारात लोहयुक्त पदार्थ – हिरव्या पालेभाज्या, सफरचंद, मोड आलेले कडधान्य, खारीक, खजूर, सुके अंजीर व बी १२ साठी दूध, दह्याचा समावेश करावा.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बी १२ च्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया :
- जी मुलं शुद्ध शाकाहारी आहेत व दूध, दहीही मुळीच खात नाहीत त्यांच्यामध्ये होतो. यासाठी शाकाहारी असणाऱ्यांनी रोजच्या आहारात दूध व दह्याचा समावेश करावा.
उपचार :
योग्य डोसमध्ये ३ ते ६ महिने आयर्नचे औषध बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावे. यासोबत बी १२ ची कमतरता असल्यास त्यासोबत बी १२ घ्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.