Angioplasty sakal
वुमेन्स-कॉर्नर

आरोग्यमंत्र : कोरोनरी अँजिओप्लास्टीनंतर

कोरोनरी अँजिओप्लास्टी म्हणजे काय, ती का केली जाते, तिची तयारी कशी केली जाते, अँजिओप्लास्टीमध्ये रुग्णाला नेमके काय होते आणि काय जाणवते आदी गोष्टींबद्दल आपण गेल्या दोन भागांत माहिती घेतली.

डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ

कोरोनरी अँजिओप्लास्टी म्हणजे काय, ती का केली जाते, तिची तयारी कशी केली जाते, अँजिओप्लास्टीमध्ये रुग्णाला नेमके काय होते आणि काय जाणवते आदी गोष्टींबद्दल आपण गेल्या दोन भागांत माहिती घेतली.

कोरोनरी अँजिओप्लास्टी म्हणजे काय, ती का केली जाते, तिची तयारी कशी केली जाते, अँजिओप्लास्टीमध्ये रुग्णाला नेमके काय होते आणि काय जाणवते आदी गोष्टींबद्दल आपण गेल्या दोन भागांत माहिती घेतली. अँजिओप्लास्टीमध्ये काही धोके असतात का या प्रश्नाच्या संदर्भात रिस्टेनोसिस (हृदयामध्ये त्याच जागेवर परत ब्लॉकेज निर्माण होणे) आणि स्टेंट थ्रोम्बोसिस (स्टेंटमध्ये रक्ताची परत गुठळी होणे) या मुद्द्यांबाबत माहिती घेतली. आता इतर काही गोष्टींची माहिती घेऊ.

रक्तस्राव : जिथे कॅथेटर घातला होता, त्या जागी म्हणजेच मांडीजवळ अथवा हातामध्ये रक्तस्राव होऊ शकतो. बऱ्याच वेळा हा रक्तस्राव सौम्य स्वरूपाचा असतो; परंतु काही वेळेस हा गंभीर होऊ शकतो व रक्त देण्याची अथवा सर्जरी करून तो रक्तस्राव थांबवण्याची गरज भासू शकते.

याव्यतिरिक्त काही कमी आढळणारे धोके आहेत तेही समजून घेऊयात.

1) हृदयविकाराचा झटका : दुर्मीळ असले, तरी प्रक्रियेदरम्यान आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. प्रक्रियेदरम्यान आपल्या कोरोनरी रक्तवाहिनीला छिद्र पडू शकते अथवा ती फाटू शकते. अशा वेळी आपल्याला त्वरेने बायपास सर्जरी करावी लागू शकते व जीवास धोका निर्माण होऊ शकतो.

2) मूत्रपिंडावरचे परिणाम : अँजिओप्लास्टीदरम्यान जो डाय टाकला जातो त्याचा दुष्परिणाम मूत्रपिंडावर होऊन त्याच्या कार्यामध्ये बाधा येऊ शकते, क्वचितपणे डायलिसिसची आवश्यकता भासू शकते. डॉक्टर आपल्या मूत्रपिंडाचे संरक्षण करण्यासाठी काही पावले उचलू शकतात. जसे की, कॉन्ट्रास्ट डायचे प्रमाण मर्यादित करणे आणि प्रक्रियेदरम्यान आपण हायड्रेटेड आहात का हे सुनिश्चित करणे.

3) स्ट्रोक (पक्षाघाताचा झटका : पॅरालिसिस) : ॲँजियोप्लास्टीदरम्यान जेव्हा कॅथेटर्स आत नेत जात असताना प्लेक्स सैल होतात व स्ट्रोक येऊ शकतो.

4) अरिधमिया (हृदयाची गती अनियमित आणि असामान्य होणे) : प्रक्रियेदरम्यान, हृदयाची गती खूप जोरात किंवा खूप हळू होऊ शकते. याला ‘व्हेंट्रीक्युलर टाकीकरर्डिया’ किंवा ‘फिब्रिलेशन’ असे म्हणतात. या वेळी हृदयाला शॉक देण्याची गरज भासू शकते. हृदयाचे ठोके कमी झाले, तर तात्पुरती पेसमेकरची आवश्यकता लागू शकते.

अँजिओप्लास्टी प्रक्रियेनंतर काय करावे?

आपली अँजिओप्लास्टी पूर्वनियोजित असल्यास आपल्याला साधारणपणे २४ ते ४८ तासांमध्ये घरी सोडता येते. हाच कालावधी जर आपली अँजिओप्लास्टी ही हार्ट ॲटॅकमुळे असेल तर वाढू शकतो. अँजियोप्लास्टीनंतर एक आठवड्यामध्ये आपण आपले दैनंदिन कार्यव्यवहार करू शकता. आपण घरी परतता, तेव्हा आपल्या शरीरातील कॉन्ट्रास्ट डाय काढून टाकण्यासाठी भरपूर प्रमाणात द्रव प्या. कमीत कमी एक दिवस कठोर व्यायाम आणि अवजड वस्तू उचलणे टाळा. इतर प्रतिबंधांबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी.

कोरोनरी अँजियोप्लास्टी कोरोनरी आर्टरीमधून रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात वाढवते. आपल्या छातीत दुखणे कमी करते आणि आपण व्यायाम करण्यास सक्षम होऊ शकता. अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंगचा अर्थ असा नाही, की आपला हृदयरोग दूर होतो. आपल्याला निरोगी जीवनशैलीच्या सवयी लावून डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधे घेणे आवश्यक आहे. समजा तुमची लक्षणे परत आली- जसे की छातीत दुखणे किंवा श्वास लागणे किंवा तर लक्षणे-तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

अँजियोप्लास्टीनंतर आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे करा

  • धूम्रपान सोडा

  • आपल्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करा

  • वजन कमी करा

  • मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवा

  • नियमित व्यायाम करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT