Diagnosis of Arrhythmia sakal
वुमेन्स-कॉर्नर

आरोग्यमंत्र : अरिदमियाचे निदान

यापूर्वी आपण अरिदमिया म्हणजे काय हे पहिले. आता त्याचे निदान कसे करतात ते पाहुयात. अरिदमिया म्हणजे हृदयाच्या विद्युतप्रवाहामध्ये निर्माण होणारे अडथळे.

डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ

यापूर्वी आपण अरिदमिया म्हणजे काय हे पहिले. आता त्याचे निदान कसे करतात ते पाहुयात. अरिदमिया म्हणजे हृदयाच्या विद्युतप्रवाहामध्ये निर्माण होणारे अडथळे.

यापूर्वी आपण अरिदमिया म्हणजे काय हे पहिले. आता त्याचे निदान कसे करतात ते पाहुयात. अरिदमिया म्हणजे हृदयाच्या विद्युतप्रवाहामध्ये निर्माण होणारे अडथळे. यामध्ये हृदयाची गती जोरात होते अथवा मंदावते. याच्या विविध लक्षणांच्या व्यतिरिक्त काही तपासण्या करून याचे निदान करू शकतो.

ईसीजी (इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम)

ही एक अतिशय स्वस्त आणि सगळीकडे सहजरित्या उपलब्ध अशी तपासणी आहे. ईसीजीमध्ये हृदयाच्या विद्युतप्रवाहाचा आलेख काढला जातो. हे तपासणी करायला काही मिनिटे लागतात. एका ईसीजीमध्ये काही सेकंदांचा हृदयालेख कळतो. यामध्ये हृदयाचे ठोके किती गतीने पडत आहेत; तसेच त्यामध्ये काही लय अनियमितता (ऱ्हिदम) आहे का ते कळते. मात्र, या तपासणीची एक अडचण आहे म्हणजे जर तो अरिदमिया त्या वेळेला झाला नाही तर ते यामध्ये दिसत नाही. ईसीजी हा तो अरिदमिया चालू असताना काढावा लागतो. याव्यतिरिक्त ईसीजीमध्ये हृदयविकाराचा झटका आला असेल, त्याबद्दलही माहिती मिळते.

हॉल्टर मॉनिटर

आपणाला ईसीजीचे जास्त वेळ निरीक्षण करायचे असेल, तर साध्या ईसीजीचा उपयोग होत नाही. त्यासाठी २४ तास अथवा काही दिवसांपर्यंत ईसीजीचे निरीक्षण करावे लागते. त्यासही हॉल्टर मॉनिटर या उपकरणाची मदत होते. या उपकरणाद्वारे ईसीजी आपल्याला सलग २४ तास ते काही दिवस नोंद करता येतो. यामध्ये ते उपकरण आणि त्याचे लीड्स हे छातीवर चिकटवले जातात. आपण जी नेहमीची कार्ये करतो ते करणे अपेक्षित असते. फक्त त्यावरून अंघोळ करण्यास मर्यादा असतात. जर अरिदमिया हा कमी वारंवारतेने होत असेल, तर त्याचे निदान करण्याची शक्यता या टेस्टमध्ये जास्त असते. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर उपकरण आपल्या डॉक्टरांना देऊन त्याच्यातील माहिती डाऊनलोड करावी लागते.

इव्हेंट मॉनिटर/ लूप रेकॉर्डर

आपल्या अरिदमियाची वारंवारता खूप कमी असेल, तर अशा वेळेस हे मॉनिटर्स उपयोगी ठरतात. हे मॉनिटरसुद्धा छातीवर चिटकविले जातात. हे काही आठवडे ते महिने ठेवता येतात. यावर एक बटन असते. ते ज्या वेळी त्रास होईल तेव्हा रुग्णाने दाबायचे असते. ते दाबल्यानंतर त्याच्या आधी आणि नंतर ५ मिनिटाचा ईसीजी रेकॉर्ड केला जातो. तपासणी संपल्यानंतर (काही आठवडे अथवा महिने) ही माहिती डाउनलोड करून त्याचा अभ्यास करून निदान करता येते. इम्प्लांटेबल लूप रेकॉर्डर हे सगळ्यात जास्त दिवसाची माहिती देऊ शकतात. यामध्ये हे उपकरण त्वचेखाली एक छेद घेऊन बसविले जाते.

स्ट्रेस टेस्ट

यामध्ये रुग्णाला ट्रेडमिल अथवा सायकलवर व्यायाम करायला लावून ईसीजी केला जातो. यामध्ये अरिदमिया जर व्यायामानंतर येत असतील, तर त्याचे निदान होते. काही वेळा अरिदमियाची तीव्रता समजण्यासाठी स्ट्रेस टेस्टचा उपयोग होतो.

२डी इकोकार्डिओग्राफी

२डी इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी. यामध्ये हृदयाच्या चालण्याबद्दल आणि कार्यक्षमतेची कल्पना येते. हृदयाचे कार्य किती क्षमतेने चाललेले आहे ते कळते. पूर्वी काही हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे का नाही ते कळते. या तपासणीमुळे अरिदमियाचे कारण शोधण्यास मदत होते. यामध्ये साधारणपणे हृदयाच्या वर्तमान आणि भूतकाळाविषयी माहिती मिळते.

कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजी स्टडी

ही एक इन्व्हेसिव्ह अथवा रुग्णालयामध्ये ऍडमिट करून करावयाची टेस्ट आहे. यामध्ये रुग्णाला तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली कॅथलॅबमध्ये झोपवून लोकल भूल दिली जाते. त्याच्या रक्तवाहिनीमधून काही लीड्स अथवा वायर्स हृदयाच्या आतपर्यंत घातले जाते. या लीड्स अथवा कॅथेटरद्वारे हृदयाच्या आतून विद्युतपुरवठ्याविषयी माहिती अभ्यास घेतला जातो. यामध्ये आरिदमिया परत तयार केला जाऊन त्याचे परिमार्जन कसे केले जावेत त्याविषयी माहिती गोळा केली जाते.

हेड अप टिल्ट टेस्ट

यामध्ये रुग्णाला झोपवून तिरके केले जाते व त्याचा रक्तदाब आणि ईसीजी याचे निरीक्षण केले जाते. हृदयाचे ठोके मंदावले अथवा रक्तदाब कमी झाला, तर काही अरिदमियांचे निदान करता येऊ शकते. ही चाचणी फक्त रुग्णालयांमध्येच करावी- कारण यामध्ये काही धोके उद्भवू शकतात. आपले डॉक्टर या किंवा अजून काही चाचण्यांचा आधार घेऊन आपल्या अरिदमियाचे निदान करू शकतात. एकदा निदान झाल्यावर मग त्याच्यावर उपाय कसा करायचा ते ठरवले जाऊ शकते. अरिदमियावर काय स्वरूपाचे उपाय करतात ते आपण पुढील भागात पाहुयात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT