arrhythmia sakal
वुमेन्स-कॉर्नर

आरोग्यमंत्र : ॲट्रियल फिब्रिलेशन

ॲट्रियल फिब्रिलेशन ही एक अनियमित आणि अनेकदा अतिशय जलद हृदयाची लय आहे (अरिदमिया) ज्यामुळे हृदयात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.

डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ

ॲट्रियल फिब्रिलेशन ही एक अनियमित आणि अनेकदा अतिशय जलद हृदयाची लय आहे (अरिदमिया) ज्यामुळे हृदयात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.

ॲट्रियल फिब्रिलेशन ही एक अनियमित आणि अनेकदा अतिशय जलद हृदयाची लय आहे (अरिदमिया) ज्यामुळे हृदयात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. A-fib स्ट्रोक, हार्ट फेल्युअर आणि हृदयाशी संबंधित इतर गुंतागुंत होण्याचा धोका वाढवते. ॲट्रियल फिब्रिलेशनदरम्यान, हृदयाच्यावरच्या चेंबर्स (ॲट्रिया) अनियमितपणे आणि जलदरीत्या धडधडतात. ॲट्रियल फिब्रिलेशनचा त्रास हा सतत अथवा काही कालावधीमध्ये होऊन परत पूर्ववत होऊन कालांतराने परत होऊ शकतो. ॲट्रियल फिब्रिलेशन मुलास प्राणघातक गुंतागुंत होण्याची शक्यता कमी असते; पण त्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा पक्षाघाताचा झटका येण्याची खूप शक्यता असते. यासाठी ऍट्रियल फिब्रिलेशनचे त्वरित निदान आणि उपचार करणे आवश्यक आहे.

ॲट्रियल फिब्रिलेशनची लक्षणे

काही लोकांना ॲट्रिअल फिब्रिलेशनची काहीही लक्षणे जाणवत नाहीत. काही कारणास्तव ईसीजी काढला, तर हे लक्षात येऊ शकते. वेगवान, धडधडणारे हृदयाचे ठोके (धडधडणे) किंवा अशक्तपणा, हलकेपणा, अत्यंत थकवा, धाप लागणे, छाती दुखणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

शक्यता कोणाला जास्त?

वाढलेले वय, उच्च रक्तदाब, स्थूलता, मधुमेह, हृदयविकार, थायरॉईड गंथीचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, धूम्रपान, अति मद्यपान या गोष्टींमुळे हा त्रास होण्याची शक्यता बळावते.

ॲट्रियल फिब्रिलेशनची कारणे

मानवी हृदयामध्ये SA नोंड नावाचा हृदयाचा विद्युत जनित्र म्हणजे पेसमेकर असतो. हा SA नोड हृदयाचे ठोके आणि त्याची लय तयार करतो. ज्या वेळेस हृदयाच्या वरच्या भागातील (ॲट्रिया) स्नायू स्वतः विद्युतठोके निर्मिती करू पाहतात, त्या वेळी हा एक अत्यंत फास्ट आणि अनियमित अशी लय किंवा अरिदमीया निर्माण होतो. यालाच ‘ॲट्रियल फिब्रिलेशन’ असे म्हणतात. याची विविध करणे आहेत- ज्यामध्ये हृदयाच्या झडपेचे आजार, कोरोनरी आर्टरी डिसीज, उच्च रक्तदाब, हृदयात जन्मापासून असलेले छित्र, हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतरची गुंतागुंत, स्लीप ॲप्निया, थायरॉईडचे रोग, काही औषधे, कफ सिरप, तंबाखूचे अतिसेवन इत्यादींचा समावेश होतो. काही व्यक्तींना कुठलेही हृदयविकार अथवा जोखीम घटक नसतानाही हा आजार उद्‍भवू शकतो.

काय धोका होऊ शकतो?

ॲट्रियल फिब्रिलेशनमुळे सगळ्यात जास्त धोका असतो तो आहे रक्ताची गाठ किंवा गुठळी होणे आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा पक्षाघाताचा पॅरालिसिस झटका येणे. यामध्ये हृदय खूप गतीने ठोके देते आणि पूर्ण कार्यक्षमतेने हृदय पंप करू शकत नाही. हृदयाच्या वरच्या कप्प्यांमध्ये रक्त स्थिर राहिल्यामुळे त्याची गुठळी निर्माण होते. ही गुठळी मेंदूमध्ये जाते आणि त्याला रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण करून मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडते. यालाच पक्षाघाताचा किंवा ‘पॅरालिसिसचा ॲटॅक’ असे म्हणतात. यामध्ये मृत्यूची शक्यता कमी असले, तरी कायमस्वरूपी अपंगत्व येणे आणि परावलंबित्व येण्याची शक्यता खूप जास्त असते. ही शक्यता टाळण्यासाठी ॲट्रियल फिब्रिलेशनच्या रुग्णांना रक्त पातळ करण्याच्या गोळ्या दिल्या जातात- ज्या नियमितपणे घेणे आवश्यक आहे.

निदान आणि उपचार

आपण मागील भागात पाहिल्याप्रमाणे ईसीजी, हॉल्टर मॉनिटर, लूप रेकॉर्डर २डी इको इत्यादी तपासण्यांमुळे ॲट्रियल फिब्रिलेशनचे निदान होऊ शकते.

या अरिदमियाच्या उपचारांमध्ये काही औषधे दिली जातात- जी हृदयाची गती आणि लय या दोन्हींना पूर्ववत करतात. यामध्ये अमिओड्रोन, बीटा ब्लॉकर अशा स्वरूपाच्या औषधांचा समावेश होतो. ही औषधे बरेच दिवस आणि काही रुग्णांमध्ये कायम स्वरूपाने घ्यावी लागतात. रक्त पातळ कारण्याची औषधे ही रुग्णांना त्यांच्या स्ट्रोकच्या धोक्याच्या शक्यतेप्रमाणे दिली जातात. यामध्ये सौम्य धोक्याची ॲस्प्रिन, क्लोपीडोग्रेल अशी अँटीप्लेटलेट औषधे दिली जातात. स्ट्रोकची शक्यता खूप जास्त असेल, तर रक्त पातळ करण्यासाठी वॉरफेरीन, असिट्रोम आणि दाबिगात्रानसारखी नवीन काही औषधे यांचा वापर केला जातो. काही औषधे चालू असताना दर महिन्याला आयएनआर नावाची रक्ताचा पातळपणा दर्शविणारी चाचणी करून घ्यावी लागते.

औषधांव्यतिरिक्त काही शस्त्रक्रियांचा वापर करून ॲट्रियल फिब्रिलेशनचा उपचार करता येतो. यामध्ये मेझ शस्त्रक्रिया आणि पल्मोनरी व्हेन अबलेशन याचा समावेश होतो.

प्रतिबंध कसा कराल?

आरोग्यदायक जीवनशैली अनुसरण्यामुळे ॲट्रियल फिब्रिलेशनची शक्यता कमी होते. यामध्ये नियमित व्यायाम, समतोल पौष्टिक आहार, मानसिक तणावमुक्ती, मद्यसेवनावर नियंत्रण, तंबाखू सेवन न करणे, कॉफी कमी प्रमाणात पिणे याचा समावेश होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT