Heart Failure Sakal
वुमेन्स-कॉर्नर

आरोग्यमंत्र : हार्ट फेल्युअरवर मात कशी कराल?

आपण मागील भागात हार्ट फेल्युअर काय असते याची माहिती घेतली, आता आपण यावर काय उपचार करतात ते पाहूया.

डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ

आपण मागील भागात हार्ट फेल्युअर काय असते याची माहिती घेतली, आता आपण यावर काय उपचार करतात ते पाहूया.

आपण मागील भागात हार्ट फेल्युअर काय असते याची माहिती घेतली, आता आपण यावर काय उपचार करतात ते पाहूया.

हार्ट फेल्युअरचे दोन प्रकार असतात.

  • इजेक्शन फ्रॅक्शन कमी असलेले हार्ट फेल्युअर (HFREF) : यामध्ये इंजेक्शन फ्रॅक्शन ४० टक्क्यांपेक्षा कमी असते.

  • इंजेक्शन फ्रॅक्शन कमी नसलेले हार्ट फेल्युअर (HFPEF) : यामध्ये इंजेक्शन फ्रॅक्शन ४० टक्क्यांपेक्षा जास्त असतो.

हार्ट फेल्युअरच्या उपचारामध्ये औषधे आणि बिगरऔषधी उपचार समाविष्ट आहेत.

औषधोपचार : वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांनी हृदयांची पंपिंगक्षमता वाढवण्यास अथवा त्याची कमी होण्याची गती मंदावण्यास मदत होते. याव्यतिरिक्त काही औषधे ही लक्षणे कमी करण्यासाठी पण उपयुक्त असतात.

मूत्राचे प्रमाण वाढविण्याची औषधे ज्याला ‘ड्युरेटिक्स’ असे म्हणतात, ज्यांनी लघवीचे प्रमाण वाढून हृदयावरील ताण कमी होतो. शरीरातील वाढलेल्या पाण्याचे प्रमाण ही औषधे कमी करतात आणि श्वासास होणारा त्रास अथवा दम कमी होतो. हे औषधे कमी कालावधीसाठी दिली जातात, यामुळे लक्षणे कमी होतात. दूरगामी परिणामांवर या औषधांचा परिणाम होत नाही. यांच्याबरोबर कधी कधी डिएगोक्सीन नावाची गोळी दिली जाते. या औषधाने हृदयाची पंपिंगक्षमता वाढण्यास मदत होते.

हार्ट फेल्युअरवरील दूरगामी उपचारांसाठी ४ प्रकारची औषधे दिली जातात.

1) ARNI (अँजिओटेन्सीन रिसेप्टर ब्लॉकर आणि सेक्युबिटरील कॉम्बिनेशन) : या औषधाने हार्ट फेल्युअरच्या उपचारांमध्ये एक क्रांती घडवून आणली आहे. या औषधामुळे हार्ट फेल्युअरच्या कारणामुळे मृत्यूची शक्यता व लक्षणे दोन्ही कमी होतात. एस इन्हिबिटर- रामीपरील इत्यादी औषधेसुद्धा हार्ट फेल्युअरच्या उपचारांमधील एक मैलाचा दगड आहेत.

2) बीटा ब्लॉकर : या औषधाने हृदयाला विश्रांती दिली जाते व हृदयाच्या पपिंगक्षमता कमी न होण्यासाठी मदत होते. या औषधांनी हृदयाचे ठोके थोडे कमी प्रमाणात पडतात.

3) अल्डोस्टेरॉन इनहिबिटर (एप्लेरेनॉन), SGLT२ इन्हिबिटर : ही औषधेसुद्धा हार्ट फेल्युअर उपचारांमध्ये अतिशय उपयुक्त आहेत.

आहार आणि हार्ट फेल्युअर

आहारामधील क्षार आणि मीठ यांचे प्रमाण कमी ठेवण्याची आवश्यकता असते. जेवणामध्ये वरून मीठ आणि मीठयुक्त पदार्थ यांचे सेवन कमी प्रमाणात करावे. लोणची, पापड, बेकरी प्रॉडक्ट्स आणि तळलेले पदार्थ ज्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते, अशा पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करावे. वेफर्स, चिवडा विकत घ्याल, तेव्हा त्याच्या वेष्टनामागे सोडियमची मात्र लिहिलेली असते, ती तपासून घ्यावी आणि जर १५० पेक्षा कमी असेल, तरच त्याचा वापर करावा. सैंधव मीठ अथवा पोटॅशियम क्लोराइड याचा वापर करून क्षारामध्ये जास्त फरक पडत नाही आणि त्याचा दूरगामी वापर फार काही उपयुक्त नाही.

1) पाणी आणि द्रवपदार्थ सेवन : हार्ट फेल्युअरच्या रुग्णांसाठी पाणी अतिशय धोकादायक आहे. नियमितपणे आपले लघवीचे प्रमाण मोजावे आणि दुसऱ्या दिवशीचे द्रव पदार्थांचे प्रमाण त्यापेक्षा कमी ठेवावे. उदा, जर आज २००० मिलिलिटर लघवी झाल्यास उद्या १५०० ते १७०० मिलिलिटर द्रव्य सेवन करावे.

2) सीआरटी पेसमेकर आणि आयसीडी : ३० टक्के हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये एकदम मृत्यू - सडन कार्डियाक अरेस्ट होऊन जीव जाऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी आणि हृदयाची पंपिंगक्षमता वाढवण्यासाठी हे आधुनिक पेसमेकर हृदयामध्ये छोटी शस्त्रक्रिया करून बसविले जातात. ही उपकरणे हृदयाच्या आतून शॉक देऊन हृदय परत चालू करतात.

3) हार्ट ट्रान्स्प्लांट : हे अतिगंभीर हार्ट फेल्युअरमध्ये केले जाते. यामध्ये रुग्णाचे हृदय बदलून त्या जागी दुसरे हृदय बसविले जाते. मात्र, ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि विविध गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये हृदयाची उपलब्धता हा सगळ्यात मोठा अडसर आहे; पण हार्ट ट्रान्स्प्लांट हा अंतिम असा उपचार आहे.

या गोष्टींचे पालन करा.

  • रोज नियमितपणे आपले सकाळी वजन करावे आणि त्याची नोंद ठेवावी. जर एका दिवसातून एकदम १ किलो वजन वाढल्यास ही धोक्याची सूचना समजून आपल्या कार्डिओलॉजिस्टशी संपर्क करावा.

  • डोळ्यापुढे अंधारी येऊन चक्कर आल्यास त्वरित त्यांना सीपीआर देऊन प्रथमोपचार करावेत.

  • चालताना अथवा बसल्या बसल्या दम लागल्यास आणि त्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढल्यास आपल्या कार्डिओलॉजिस्टशी संपर्क करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT